Pune News, 02 Jan : पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (Shivsena UBT) मोठा धक्का बसला आहे. ठाकरेसेनेचे पाच माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची घोषणा विशाल धनावडे, बाळा ओसवाल या माजी नगरसेवकांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. मात्र पक्ष सोडताना या माजी नगरसेवकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
विशाल धनावडे यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझी शिवसेना (Shivsena), उद्धवसाहेब, आदित्यसाहेब यांच्याबद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. परंतु पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही. तसंच शिवसेना वाढवण्यासाठी काम करण्याची भूक आहे.
त्याला काम करू न देणे हे मागील 5 वर्षे झाले चालू आहे, पक्षातील जे नगरसेवक आहे ते वाढवायचे सोडून जे आहेत त्यांच्याच पायात पाय घालण्याचे काम चालू आहे. ज्यांचे खरे काम बॅक ऑफिस सांभाळणे आहे त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे. पक्षात मागील 5 वर्षात पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही की त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे पुण्यातील (Pune) शहर प्रमुखांवरती धनावडे यांनी निशाणा साधला आहे.
यावर आता शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. थरकुडे म्हणाले, पक्ष सोडणाऱ्या माजी नगरसेवकांवर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांना निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात किती बैठका घेतल्या तसेच शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले हे त्यांना विचारण्याची आवश्यक आहे.
या सर्वांना फक्त सत्तेची हाव होती आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता आम्हाला मिळू शकली नाही म्हणून विधानसभा निकालानंतर या सर्वांनी पक्षातून पळ काढला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठे यश मिळालं आहे. त्यामुळे या सर्वांना पराभवाची धास्ती वाटत आहे. त्यामुळे यांनी पळ काढला आहे. जाताना पक्ष सोडताना कोणाच्यातरी डोक्यावरती खापर फोडायचं म्हणून स्थानिक नेत्यांवरती टीका करत असून स्वतः पक्ष वाढीसाठी कोणतेही काम केलं नसल्याची टीका गजानन थरकुडे यांनी केली.
शहरांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये देखील या नेत्यांकडून फार सहभाग घेण्यात येत नव्हता. महापालिकेत नगरसेवक म्हणून असताना या सर्वांना शिवसेनेने भरभरून दिलं. मात्र, पडत्या काळात भीती पोटी पक्ष सोडला असल्याचंही थरकुडे म्हणाले. तसंच शिवसेनेतील फुटीमुळेही काही फरक पडला नाही, तर अशा काही माजी नगरसेवकांच्या जाण्याने तो पडेल, असे होणार नाही. आम्ही पुन्हा नव्या जोमाने पक्षांची बांधणी करू, असंही ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.