Pune PMC News : 'भाजपचा भलताच कॉन्फिडन्स'! प्रभाग रचना मनासारखी झाल्याने आता 100 नाही, तर इतके नगरसेवक निवडून आणण्याचे 'प्लॅनिंग'

Pune BJP corporators plan : महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेनंतर आता अंतिम प्रभागरचनेवरही सत्ताधारी भाजपचा वरचष्मा राहिला आहे. अंतिम प्रभागांच्यारचनेत जे बदल करण्यात आले आहेत. तेही भाजपला अनुकूल ठरणार आल्याचे बोले जात आहे.
Pune BJP corporators plan
Pune BJP corporators planSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेनंतर आता अंतिम प्रभागरचनेवरही सत्ताधारी भाजपचा वरचष्मा राहिला आहे. अंतिम प्रभागांच्यारचनेत जे बदल करण्यात आले आहेत. तेही भाजपला अनुकूल ठरणार आल्याचे बोले जात आहे. त्यामुळे आरडाओरड करून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आलेल्या हरकती-सूचनांना ठेंगा दाखविण्यात आल्याचे अंतिम रचनेवरून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे यंदा मागील निवडणुकी सारखाच 100 चा आकडा गाठायचा असं ध्येय न ठेवता. भाजपने प्रभाग रचना मनासारखी झाल्याने आता पुणे महापालिकेतील नगरसेवकांचा विजयाचा आकडा वाढवला असल्याचं पाहायला मिळत आहे.

महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) या तिन्ही घटक पक्षांना प्रभागरचनेत अनुकूल व्यवस्था मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रारूप प्रभागरचनेत भाजपने स्वतःच्या सोयीनुसार बदल केल्याचा आरोप विरोधकांसह भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही केला होता. प्रभागरचना करताना नदी, नाले, डोंगर यांसारख्या नैसर्गिक सीमांचा विचार न केल्याचा आरोपही झाला होता.

प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यावर ती पूर्णपणे भाजपला पोषक असल्याचे दिसून आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवले होते. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अंतिम रचनेत किमान राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांच्या प्रभागांमध्ये बदल करून त्यांना अनुकूल रचना होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, अंतिम रचनेतही भाजपचाच वरचष्मा राहिल्याचे दिसत आहे.

Pune BJP corporators plan
Rohini Khadse : 'खेवलकर आरामात सुटतील, पण आता.., रोहिणी खडसे नेमक्या काय म्हणाल्या?

विशेषतः सत्तेत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे आणि हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या मतदारसंघांतील माजी नगरसेवकांनी प्रभागरचनेबाबत घेतलेल्या आक्षेपांवर अंतिम रचनेत कोणताही बदल झालेला नाही. एकूणच, विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या हरकती आणि सूचनांकडे अंतिम रचनेत पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Pune BJP corporators plan
Pune Crime : मोठी बातमी: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमागं भाजप अन् अजितदादांची राष्ट्रवादी; 'या' बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

मनासारख्या झालेल्या प्रभाग रचनेमुळे भाजपमध्ये मात्र भलताच कॉन्फिडन्स आला असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपर्यंत भाजप मागील निवडणुकीप्रमाणे यंदा 100 जागा जिंकण्याच्या नियोजनात होती मात्र आता भाजपने हे टार्गेट वाढवून 125 केला आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत 165 पैकी 125 नगरसेवक निवडून आणण्याचं ध्येय आता भाजपने स्वतः समोर ठेवला आहे. त्या दृष्टिकोनातून काही प्रभागांमध्ये इन्कमिंग देखील होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपने 125 चा आकडा गाढण्यासाठी काही प्रभागातून मातब्बर असे मोहरे निवडले असून निवडनूकी पूर्वीच त्यांचा प्रवेश ही घडून आणण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com