Pune Police: पुणे पोलिसांना मोठा दणका ; CP अमितेश कुमार, DCP मिलिंद मोहितेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस

Human Rights Commission: अल्पवयीन मुलांना कथित बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली.
Pune Police
Pune Police, Human RightsSarkarnama
Published on
Updated on

Human Rights Commission: अल्पवयीन आरोपींना कथित मारहाण आणि अमानुष वर्तन केल्याच्या गंभीर प्रकाराची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे.

समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या व्हिडिओची आयोगाने स्वतःहून दखल घेतली होती. त्यानंतर तथ्यशोधन समिती स्थापन करून संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर, न्यायमूर्ती स्वप्ना जोशी आणि सदस्य संजय कुमार यांच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीनंतर अंतरिम शिफारस आदेश जारी करण्यात आला.

Pune Police
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा निर्धार पक्का! चलो मुंबई, तयारी सुरू; सरकारला घेरण्याची रणनीती ठरली!

तसेच या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलिस महासंचालक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत करण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणात पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त मिलिंद मोहिते आणि वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे.

Pune Police
Gokul News : "अदृश्य शक्तीला महायुती पॅनेलमधून वगळा, दारातही उभं करायच नाही" : गोकुळमधील 1400 संस्थांचा ठराव, मेळाव्यात महाडिक सोडून सगळ्यांचे आभार

आयोगाच्या तथ्यशोधन समितीच्या अहवालानुसार, भारती विद्यापीठ पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी तीन मुलांना जीपच्या बोनेटला दोरीने बांधून आंबेगाव पठार मार्गावरून नेले होते. यावर बोलताना राज्य मानवाधिकार आयोगाने दिलेल्या आदेशाला पुणे पोलिसांच्या वतीने आव्हान देण्यात येणार आहे, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com