NCP Vikas Lawande: पुणे पोलिसांकडून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक

NCP Political News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना दाखल गुन्ह्यात वाघोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे व  आमदार रोहित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात जमा झाले. यामुळे पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते.
Vikas Lawande controversy
Vikas Lawande controversySarkarnama
Published on
Updated on

Pune Wagholi News: राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना दाखल गुन्ह्यात वाघोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलिस ठाण्यात जमा झाले होते. यामुळे पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते.

कीर्तनकार, प्रवचनकार, सांप्रदायिक यांच्या विरोधात सोशल मीडियातील व्हिडिओ द्वारे अपशब्द वापरून काही कीर्तनकारांची नावे टाकून ते घुसखोर असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला होता. या व्हिडिओवरून कीर्तनकार नलिनी आशिष वायाळ ( वय 41, रा. येरवडा ) यांनी 8 मे 2026 रोजी लवांडे यांच्या विरोधात वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी धार्मिक भावना दाखविणे, समाजात तेढ निर्माण करणे याबाबत लवांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान म्हातोबाची आळंदी येथे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी कार्यकर्त्यांसह लवांडे यांच्य अंगावर शाई ओतून त्यांचा निषेध केला होता. त्यानंतर लवांडे यांनीही भंडारे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

यानंतर सांप्रदायिक क्षेत्र, हिंदू समाज, बजरंग दल या कार्यकर्त्यांनी 10 मे रोजी वाघोली पोलिस ठाण्यात लवांडे यांना अटक करावी यासाठी आंदोलन केले होते. दरम्यान, लवांडे यांनी न्यायालयात अंतरिम जमिनीसाठी अर्ज केला होता. तो बुधवारी ( दि.20 ) फेटाळल्याने गुरुवारी त्यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यात आल्याचे कळताच काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात जमा झाले.

Vikas Lawande controversy
Vikas Lawande Arrested : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात, 'चोर सोडून संन्याशाला फाशी...' , मनातल्या भावना बोलून दाखवल्या

विकास लवांडे यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजताच काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात जमा झाले. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. याचदरम्यान, सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार पक्ष ) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनीही सुमारे एक तास पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

शशिकांत शिंदे यांनी विकास लवांडे यांना अटक करू नये, अशी विनंती पवार व शिंदे यांनी पोलिसांना केली. मात्र, सहा वाजता लवांडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आले. यावेळी मला बेड्या घाला. माझ्यावर झालेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना लवांडे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com