Vikas Lawande Arrested : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात, 'चोर सोडून संन्याशाला फाशी...' , मनातल्या भावना बोलून दाखवल्या

NCP leader Vikas Lawande arrested news: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी या विषयी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
Vikas Lawande taken into police custody
Vikas Lawande taken into police custodySarkarnama
Published on
Updated on

Vikas Lawande speaks out after detention: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवांडे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

'माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे?', असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते त्यांना घेऊन वाघोली पोलिस ठाण्यात गेले आहे. या विषयी लवांडे यांनीच आपल्या ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. लवांडे यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, याची माहिती समजू शकली नाही.

Vikas Lawande taken into police custody
Sharad Pawar NCP News: शरद पवारांच्या पक्षातील प्रवक्त्यावर शाई फेक! किर्तनकारांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

वारकरी संप्रदायात घुसखोरीचा आरोप

वारकरी संप्रदायात हिंदुत्ववाद्यांची घुसखोरी झाली आहे, असे सांगत काही महाराजांच्या नावाची यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीर केली होती. त्यानंतर बापू भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांच्यावर शाही टाकली होती. या प्रकरणी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती.

Vikas Lawande taken into police custody
Vikas Lavande Vs Sangram Bhandare : शाई फेकीनंतर संग्राम भंडारे यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, 'लवांडे, थांबले नाहीत तर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com