Lok Sabha Election 2024 : लोकशाहीचा उत्सव, जिल्ह्यात पोलिस प्रशासन अलर्ट!

Pune Police News : पोलिसांच्या मदतीसाठी इतर राखीव दलांच्या जवानांच्या मदतीचा प्रस्तावही पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात येत आहे
Pune Police
Pune PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pune News : देशभर लोकसभेची धामधूम सुरू आहे. राज्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर बारामतीत होत असलेल्या सुप्रिया सुळे Supriya Sule विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे.

बारामतीसह पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रचाराची मोहीम तीव्र केली आहे. परिणामी अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस सज्ज झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

पंकज देशमुख बारामतीत Baramati प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सर्वच मतदारसंघातील पोलिस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्र व इतर बाबींचा आढावा घेतला जात आहे. पोलिसांच्या मदतीसाठी इतर राखीव दलांच्या जवानांच्या मदतीचा प्रस्तावही पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या जवानांची एक तुकडी आली होती, तेव्हा तिची मदत घेण्यात आली.

Pune Police
Shivsena UBT : 'नकली शिवसेना अन् नकली राष्ट्रवादी'वरून महाराष्ट्रात धुरळा

प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासह अवैध व्यवसायांवरही कारवाई सुरू आहे. आंतरजिल्हा पोलिस Police तपासणी केंद्र उभारण्यात आली असून पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर वाहनांची नियमित तपासणी सुरू आहे. मतदान प्रक्रियेत बाधा आणतील अशा घटकांवर पोलिस कठोर कारवाई करतील. इतर यंत्रणांसमवेतही पोलिसांची समन्वय असून कायदा व सुव्यवस्था कायम असेल याची काळजी यंत्रणा घेईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदान किंवा निवडणूक प्रक्रीयेत कोणीही बाधा आणली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देशमुखांनी यावेळी दिला आहे. तर मतदान केंद्राची पाहणी व पुरेसा बंदोबस्त याचेही नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरिक्षक राहुल घुगे उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Pune Police
Prakash Ambedkar News : '...तर काँग्रेसने रिंगणातून बाहेर पडावे', ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com