Pune Political News : 'त्या' प्रकरणात आता भाजप-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

Pune Crime News : पोलिसांनी काढलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आंदोलन केल्याने पोलिसांनी आता आमदार धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Pune Political News
Pune Political NewsSarkarnama

Pune Political News : पुणे लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस चौकीमध्ये ठिय्या करत आंदोलन केलं होतं. (Latest Marathi News)

यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते एकामेकांसमोर ठाकल्याचे पाहायला मिळाले. यामुळे काही काळ सहकारनगर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी या प्रकरणांमध्ये काँग्रेस आमदार आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र या प्रकरणात दोन्ही पक्षांकडून जमाव जमा करण्यात आला असताना फक्त महाविकास आघाडीच्याच कार्यकर्त्यांवरच कारवाई का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्यांवरती सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे पदाधिकारी राजेंद्र शिळीमकर, महेश वाबळे, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Political News
BJP Politics: भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्त होण्याची अलिखित परंपरा कधी सुरू झाली?
Pune Political News
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

दरम्यान लोकसभा (Lok Sabha) सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहितेचा भंग करून, बेकायदेशीर जमाव जमवून व घोषणा देऊन वरील आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ठाण मांडले होते. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी काढलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आंदोलन केल्याने पोलिसांनी आता आमदार धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांवर ते आणि कार्यकर्त्यांवरती देखील गुन्हे दाखल झाले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com