Kolhapur News: कोल्हापूरच्या हद्दवाढीवर बोलता बोलता शिवसेनेच्या आमदाराची गाडी थेट लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचली

Shivsena MLA On Kolhapur City Boundary Expansion : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. आयोगाचे काही नियम आहेत. काही निकष आहेत. त्यामुळे हद्दवाढीबाबत गडबड करून चालणार नसल्याचे मत देखील आमदार नरके यांनी स्पष्ट केले.
Chandradeep Narke On Kolhapur .jpg
Chandradeep Narke On Kolhapur .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत मंत्रालयात कोणती अधिकृत बैठक झालेली नाही. कॅबिनेट बैठक झाल्यानंतर त्यांना हद्दवाढ हवी आहे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे. आठ गावांचा देखील या हद्दवाढीला विरोध असून लोकांची जी भूमिका आहे, तीच माझी आहे. मुलगा मुलगीला दोघांनाही लग्नासाठी दाखवले तर दोघांची पसंती असावी लागते. लोकशाही आहे. भावांचा विरोध असताना हद्दवाढ कशी करू शकता? अशा शब्दांत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून मिश्किल टोला शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narke) यांनी लगावला आहे.

कोल्हापूर शहराच्या हदवाढीवरून शिवसेनेच्या दोन्ही आमदारांमध्ये जुंपली आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही अटळ असल्याचे सांगत प्रस्तावित आठ गावांचा विचार केला असल्याची माहिती दिली.

त्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक देखील झाली असल्याचं सांगण्यात आलं. त्यावरून आता आमदार चंद्रदीप नरके यांनी क्षीरसागर यांच्या वक्ताव्याचा दाखला देत मंत्रालयात अशी कोणतीच अधिकृत बैठक झालेली नाही. असे स्पष्टीकरण देत खळबळ उडवून दिली आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत(Kolhapur City Border Extenion) कोणती अधिकृत बैठक झालेली नाही. अशी बैठक झाली असती तर ज्या गावांचा समावेश केला जाणार आहे. त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यालाही आमंत्रण आले असते. मात्र, कोणतेच आपल्याला आमंत्रण आलेले नाही असे स्पष्टीकरण आमदार चंद्रदीप नरके यांनी दिले.

Chandradeep Narke On Kolhapur .jpg
Anil Deshmukh News: 'भास्कर जाधवांची जी खंत, तीच अजितदादांच्या...'; अनिल देशमुखांचा धक्कादायक दावा

यापूर्वी 42 गावांसाठी प्राधिकरण स्थापन झालेले आहे. ते प्राधिकरण बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केले असल्याचं देखील चंद्रदीप नरके यांनी सांगितलं.

एकीकडे विकासासाठी प्राधिकरण नेमले असताना त्यात समावेश केलेल्या गावांचा पुन्हा हद्दवाढीत समावेश कसा काय करू शकता? असा सवाल करत हद्दवाडीला विरोध करणारे शहरात राहतात आरोप केला जातो. मात्र, असा कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करू नका. त्यामुळे कोण कुठे राहतो याचा मुद्दा महत्त्वाचा नाही.

Chandradeep Narke On Kolhapur .jpg
Indian Gold: एकेकाळी 'सोने की चिडिया' असलेल्या भारतात सध्या किती सोनं आहे..? ऐकून तुम्हालाच नाही, पाकिस्तानलाही बसणार शॉक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. आयोगाचे काही नियम आहेत. काही निकष आहेत. त्यामुळे हद्दवाढीबाबत गडबड करून चालणार नसल्याचे मत देखील आमदार नरके यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com