Swarget Rape Case : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी आमदाराचा कार्यकर्ता?; आमदार कटके म्हणाले, ‘माझा मतदारसंघ...’

Accused NCP MLA's Activist : स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराच्या घटनाप्रकरणातील आरोपी हा दत्तात्रेय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट येथील असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय तो शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्त्याचा असल्याचीही चर्चा रंगली आहे.
Datta Gade-Dnyaneshwar Katke
Datta Gade-Dnyaneshwar KatkeSarkarnama
Published on
Updated on

Pune, 27 February : गावाकडे निघालेल्या तरुणीवर स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका एसटी बसध्ये अत्याचाराची घटना घडली आहे, त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. विरोधी पक्षांकडूनही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे हा शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर कटके यांनी आपली भूमिका मांडताना तो आपला कार्यकर्ता नसल्याचे म्हटले आहे.

स्वारगेट बसस्थानकातील (Swarget Bus Stand) अत्याचाराच्या घटनाप्रकरणातील आरोपी हा दत्तात्रेय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट येथील असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय तो शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा कार्यकर्त्याचा असल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर राग व्यक्त केला जात आहे.

पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या स्वारगेट बसस्थानकात ही दुर्दैवी घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेवरून सवाल उपस्थित केले जात आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवरून महायुती सरकारला विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

Datta Gade-Dnyaneshwar Katke
Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांच्या मनातील खदखद अखेर बाहेर आलीच; ‘किती बेईमान विचारांची माणसं...त्यावेळी त्यांची तोंडं शिवली होती का?’

या प्रकरणातील आरोपी हा शिरूर तालुक्यातील असून तो राष्ट्रवादीच्या आमदारांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात असल्याने आमदार कटके यांच्यावर निशाणा साधला जात आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टार्गेट केले जात आहे. मात्र, यावर आता खुद्द आमदार कटके (Dnyaneshwar Katke) यांनी आपली बाजू मांडली आहे.

Datta Gade-Dnyaneshwar Katke
Swarget Rape Case : स्वारगेट अत्याचाराच्या घटनेवरून विरोधी पक्ष आक्रमक; वडेट्टीवार विधानसभेत नेणार प्रकरण

शिरूर हवेली मतदारसंघातील अनेक लोक मला विकास कामांच्या निमित्त भेटत असतात. हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे, त्यामुळे भेटणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेशी माझा कुठलाही संबंध नाही. संबंधित आरोपीच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात यावा आणि गाडे या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे, असे ज्ञानेश्वर कटके यांनी स्पष्ट केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com