Pune Rave Party : महिला आयोगाच्या 'त्या' आदेशामुळे रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढणार

Eknath Khadse Son-in-law Case : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Rupali_Chakankar & Rohini Khadse
Rupali_Chakankar & Rohini KhadseSarkarnama
Published on
Updated on

Pune Rave Party Probe : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

कारण पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाच्या तपासासाठी महिला आयोगाने विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. रेव्ह पार्टीसाठी शेकडो महिलांना विविध प्रलोभन देऊन फसवण्यात आल्याचा आरोप खेवलकर यांच्यावर करण्यात आला आहे.

शिवाय या अश्लील पद्धतीने महिलांचे व्हिडिओ शूट केल्याचं उघडकीस आल्यानंतर या सर्व प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश महिला आयोगाने दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितलं की, खेवलकरांच्या रेव्ह पार्टी प्रकरणात 300 हून अधिक महिलांना आमिष दाखवून फसवलं गेलं.

Rupali_Chakankar & Rohini Khadse
Bajrang Sonwane On Hake: 'लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणुक लढवायची...' ; खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं मोठं विधान

या पार्टीदरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपमधून अश्लील व्हिडीओ मिळाले आहेत. या प्रकरणातील पीडित महिलांच्या तक्रारींच्या आधारे पुणे पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून हा तपास सखोल व्हावा यासाठीच SIT गठीत करण्याची मागणी केली आहे, असं चाकणकर यांनी सांगितलं.

Rupali_Chakankar & Rohini Khadse
Minatai Thackeray Statue Video : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्याला अटक; ठाकरेंच्या कार्यकर्त्याच्या भावाचे कृत्य, स्वतः दिली कबुली

तर या प्रकरणाचा संबंध ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेटशी असू शकतो. पार्टीसाठी आणलेल्या महिलांचा गैरवापर झाला असावा. भविष्यातही अशाच पद्धतीने महिलांची फसवणूक होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, चाकणकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आधीच अडचणीत आलेले खडसेंचे जावई खेवलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com