Pune Mob Attack :धक्कादायक! "डोक्यावरील टोप्या काढा, ही जागा...," 'रोजा' सोडायला बसलेल्या तरुणांवर 100 जणांकडून हल्ला

Pune Crime News : पुणे ग्रामीणमधील सासवडजवळ तलावावर इफ्तारसाठी जमलेल्या मुस्लिम तरुणांवर 100 ते 150 जणांच्या जमावाने काठ्या, कोयते आणि चाबकाने हल्ला केल्याची घटना घडली असून पोलिस तपास सुरू आहे.
Police investigation underway after a mob allegedly attacked youths gathered for Ramzan iftar near a lake close to Saswad in Pune district.
Police investigation underway after a mob allegedly attacked youths gathered for Ramzan iftar near a lake close to Saswad in Pune district.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे ग्रामीण भागातील सासवड जवळील ऑस्करवाडी गावाजवळ (ता.13) शुक्रवारी सायंकाळी एका तलावाच्या ठिकाणी रमजानच्या रोजा इफ्तारसाठी जमलेल्या मुस्लिम तरुणांच्या गटावर सुमारे 100 ते 150 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना घटली आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून, पोलिसांनी 10 ते 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे 6:30 वाजता घडली. तक्रारदार फिरोज जावेद सय्यद वय वर्ष 25 आणि त्याचे सुमारे 10 मित्र तलावाजवळ इफ्तारसाठी तयारी करत असताना दुचाकींवरून आलेल्या 100 हून अधिक जणांच्या गटाने त्यांची चौकशी सुरू केली.

या ठिकाणी कशासाठी आला आहात अशी विचारणा केली त्यावेळी उपवास सोडायसाठी आलो असल्याचे सांगितले असता जमावाने "ही जागा तुमची मालकीची आहे का?", "डोक्यावरील टोप्या काढा" आणि "तुम्ही विशिष्ट वेशभूषा करून येथे का आला आहात?" असे प्रश्न विचारले, तसेच शिवीगाळ केली.नंतर जमावाने काठ्या, कोयता, चाबूक यांसारख्या हत्यारांनी तरुणांवर हल्ला केला असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Police investigation underway after a mob allegedly attacked youths gathered for Ramzan iftar near a lake close to Saswad in Pune district.
Pune News : PM मोदींना पुरस्कार दिल्यानं काँग्रेसनं नातं तोडलं; पुण्यातील लोकमान्य टिळकांचे वारसदार आता शिवसेनेच्या वाटेवर

जखमी तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींना पुढील उपचारांसाठी घरी नेण्यात आले. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 118 (1), 189 (2), 190 आणि इतर संबंधित कलमांखाली तसेच शस्त्र कायद्यांतर्गत गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

Police investigation underway after a mob allegedly attacked youths gathered for Ramzan iftar near a lake close to Saswad in Pune district.
Pune Metro : प्रतीक्षा संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 'मे महिन्यात...'

सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले की, याप्रकरणी घातक शस्त्रांनी दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव, दंगल घडवणे आणि शांतताभंग यांच्याशी संबंधित कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत."10 ते 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तपास सुरू आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com