Manoj Jarange Patil Video : "आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाहीत..."; जरांगेंना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील याची मला खात्री आहे, असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील याची मला खात्री आहे, असा विश्वास मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शिवाय यावेळी त्यांनी जर मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही जी काही गणितं जुळवली आहेत, ती सर्व गणितं आचारसंहितेपूर्वी आरक्षण दिलं नाही तर बिघडवून टाकेन, असा इशारा देखील दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शिवाय आता विधानसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुका जवळ येतील तशी आक्रमक भूमिका घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. अशातच आता भाजपच्या आमदार खासदार आणि नेत्यांना फडणवीसांना आपल्या मागण्या मान्य करायला सांगा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Top 10 News: ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा, गुजरात पॅटर्न भाजपच्या अंगलट येणार? 'लाडक्या बहिणी'मुळे आठवड्याला 3 हजार कोटींचे कर्ज? वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास तुमची सगळी गणितं बिघडवून टाकेन असा इशारा त्यांनी फडणवीसांना दिला आहे. जरांगे म्हणाले, "देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत. ते पुढे ढकलतील किंवा आचारसंहिता लागण्यापूर्वी मागण्या पूर्ण करतील याची मला 100 टक्के खात्री आहे.

कारण आम्हाला राजकारणात जायचं नाही. मात्र, निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा, नाहीतर तुमच्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक असेल, ती मोठी पश्चातापाची वेळ असेल."

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
BJP Politics : विद्यमान आमदारांना घरी बसवण्याचा गुजरात पॅटर्न भाजपच्या अंगलट येणार?

शिवाय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर फडणवीसांच्या मागे उभं राहायचं नाही. भाजपमधील मराठ्यांनी पण हाच विचार करावा आणि फडणवीसांना सांगा नाहीतर माझा नाईलाज आहे. मराठ्यांना आपली लेकरं मोठी करायची असतील तर फडणवीस साहेबांना मागण्या पूर्ण करायला सांगा, असं जरांगे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com