Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांना पुणे कोर्टाची नोटीस! आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

Pune Court notice to Amruta Fadnavis:सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ जण अटकेत असून २ जण फरार आहेत.
 Amruta Fadnavis Latest News
Amruta Fadnavis Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune Court notice to Amruta Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात व्यक्तींविरोधात एप्रिल महिन्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आता सुनावणी होणार असून या सुनावणीला हजर राहण्यासाठी पुणे सत्र न्यायालयानं अमृता फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे.

 Amruta Fadnavis Latest News
Jagdeep Dankhar Resigns: उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा अचानक राजीनामा! वैद्यकीय कारणास्तव पद सोडत असल्याची घोषणा

या प्रकरणामध्ये पुण्यातील एका व्यक्तीनं सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीनं सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्याबद्दल अपमानास्पद आणि चुकीची माहिती शेअर केली होती. यामध्ये अमृता फडणवीस यांची सामाजिक प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं नमूद करण्यात आलं होतं. समाज माध्यमावर अमृता फडणवीस यांची बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांपैकी पाच आरोपी अटक असून दोन जण फरार आहेत. अटकेत असलेल्या आरोपी यांच्याकडून पुणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.

 Amruta Fadnavis Latest News
विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंची संपत्ती किती?

दरम्यान, या प्रकरणांमध्ये सुनावणी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पुणे सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कोर्टात हजर राहा किवा वकिलांमार्फत आपलं म्हणणं कळवावं असंही कोर्टानं या नोटीशीत म्हटलं आहे. या प्रकरणात अमृता फडणवीस यांची वैयक्तिक बदनामी झाली असल्याचं नमूद करण्यात आल्यानं त्यांचं याबाबत काय मत आहे? हे कोर्टाला जाणून घ्यायचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com