Pune Election Crime: धक्कादायक! 'निवडणुकीतून माघार घे,नाहीतर तुझा संतोष देशमुख करू..'; गाडी अडवून उमेदवाराला धमकावलं

Pune Local Body Elections: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विविध ठिकाणी गालबोट लागले. हाणामारी,बाचाबाची, गाड्या फोडणे, दगडफेक यांसह राजकीय नेत्यांचे समर्थक एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. पण अशातच पुण्यातील फुरसुंगी भागात एक धक्कादायत घटना समोर आली आहे.
Local-Body-Elections
Local-Body-ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विविध ठिकाणी गालबोट लागले. हाणामारी,बाचाबाची, गाड्या फोडणे, दगडफेक यांसह राजकीय नेत्यांचे समर्थक एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. पण अशातच पुण्यातील फुरसुंगी भागात एक धक्कादायत घटना समोर आली आहे. ‘निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू’ अशी धमकी एका उमेदवाराला दिल्याची घटना फुरसुंगी येथे घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत अरुण बनसोडे (वय 42) हे कामानिमित्त सासवड रोड रेल्वे स्टेशनवरून दुचाकीवरून भोसले व्हिलेजकडे जात होते. रविवारी (ता. 1) रोजी दोन तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली. यातील एका तरुणाने बनसोडे यांना ‘निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख (Santosh Deshmukh) करू,’ अशी धमकी दिली.

त्याचवेळी आरोपीकडील हत्यार बनसोडे यांच्या नजरेस पडले. दुसरा तरुण काही अंतरावर रेल्वे पटरीजवळ थांबलेला होता. त्याच्याकडेही शस्त्र असल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे.

दोन्ही आरोपींचे वय अंदाजे 18 ते 19 वर्षे असून दोघांनीही चेहऱ्यावर मास्क बांधले होते. घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस (police) निरीक्षक अमोल मोरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे आणि विष्णू देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.

Local-Body-Elections
Santosh Bangar News: फडणवीसांनी झापलं, गुन्हाही दाखल, आता संतोष बांगर यांची थेट आमदारकीच रद्द करण्याची मागणी समोर

फिर्यादी बनसोडे यांच्या तक्रारीवरून दोन्ही अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश नलवडे करीत आहेत.

बुलढाणा नगरपालिका निवडणुकीच्या आजच्या मतदानावेळी एकनाथ शिंदे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये हाय होल्टेज ड्रामा रंगला. आमदार संजय गायकवाड यांनी बोगस मतदार आणल्याचा आरोप काँग्रेसने केला. या मतदारांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर एकच राडा झाला.

Local-Body-Elections
Sambhaji Patil Nilangekar : निलंगा नगरपालिका निवडणुकीला स्थगिती, संतापलेले संभाजी पाटील निलंगेकर उचलणार मोठं पाऊल

या बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर, यात आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी हस्तक्षेप केला. पोलिसांना शिवीगाळ अन् दमदाटी करत, या बोगस मतदारांना पळवून लावले. या राड्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले असून, निवडणूक आयोग आणि पोलिस यंत्रणेने कायदेशीर कारवाई करावी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com