Maharashtra MLC Election: पुण्याला आणखी दोन आमदार मिळणार! विधान परिषदेच्या 5 जागांसाठी इच्छुकांनी मंत्रालयापर्यंत लावली ताकद

Pune Mahayuti Politics: विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांकडून जोरदार फील्डिंग सध्या वरिष्ठांकडे सुरू आहे. पुण्यातील देखील दोन नेते या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावेदार असल्याचं बोललं जात आहे.
Vidhan Parishad
Vidhan ParishadSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपला तीन शिंदेंच्या शिवसेनाला एक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. या पाच जागांसाठी महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळत आहेत.

विधान परिषदेचा (Vidhan Parishad MLA) आमदार होण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांकडून जोरदार फील्डिंग सध्या वरिष्ठांकडे सुरू आहे. पुण्यातील देखील दोन नेते या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावेदार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावा केला आहे.

मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी देखील मानकर यांनी आपल्याला संधी मिळावी अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती. मात्र संधी डावल्यानंतर त्यांनी थेट राजीनामा अस्त्र देखील उभारलं होतं. मात्र त्यावेळीस पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे यावेळेस मानकर यांना संधी दिल्याची जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Vidhan Parishad
Mahayuti Government: महायुती सरकारनं घेतला मीडियाचा मोठा धसका!10 कोटींचा खर्च करुन घेतला 'हा'निर्णय

तसेच भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीवेळी जागा वाटपामध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानंतर जगदीश मुळीक यांना विधान परिषदेचा शब्द दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असलेले सुनील टिंगरे यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे या मतदारसंघातून आता जगदीश मुळीक यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पुण्याला आणखीन दोन आमदार मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे.

Vidhan Parishad
Santosh Deshmukh Photos : जे फोटो पाहून महाराष्ट्र हादरला त्यावर संतोष देशमुखांच्या मुलीची काळीज पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया

याबाबत बोलताना मानकर म्हणाले, विधान परिषदेच्या आमदार पदासाठी पक्षाकडे दावा केला आहे. इतके दिवस ज्या पद्धतीने मी पुणे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहे दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे योग्य निर्णय घेतील. पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून जे काम मी उभं केलं आहे. ते अजित पवार यांना माहिती आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठं काम हे पक्ष संघटनेच्या माध्यमातून पुण्यात करण्यात आला आहे.

सध्या पंधराशे जणांची कार्यकारिणी पुण्यामध्ये कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून विधानसभा आणि लोकसभेला चांगलं काम केलं आहे. त्यामुळे काम करणाऱ्या माणसाच्या मागे पक्ष हा कायम उभा राहतो,असंही मानकर यांनी यावेळी सांगितलं.

दादांना माझ्या दावेदारीबद्दल मी सांगितलं असून ते जे निर्णय घेतील तो मान्य असणार आहे. जरी त्यांनी मला संधी दिली नाही तरी मी अजित पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे देखील मानकर यांनी स्पष्ट केलं. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी जगदीश मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com