Pune Metro Fraud Case : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल 3 कोटी 78 लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

Pune investment scam News : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सिमेंट-स्टील पुरवठ्यात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून उरुळी कांचन येथील दाम्पत्याची तब्बल 3 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक झाली.
Police register fraud case after a couple from Pune alleged ₹3.78 crore cheating in the name of investment in cement and steel supply for the Pune Metro project.
Police register fraud case after a couple from Pune alleged ₹3.78 crore cheating in the name of investment in cement and steel supply for the Pune Metro project.Sarkarnama
Published on
Updated on

सुनील जगताप

Uruli Kanchan News : पुणे मेट्रो या प्रकल्पासाठी सिमेंट व स्टील पुरवठा केला तर मोठा नफा व परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका दाम्पत्याची तब्बल 3 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी प्रिती विनोद जैन (वय 42,रा.कृषीतंत्र विद्यालय,मांजरी फार्म,मांजरी बुद्रुक,ता.हवेली.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी संतोष सुरेश काकडे (रा.राहींजवस्ती, लोणी काळभोर,ता.हवेली) व अतुल पवार (रा.खिलारवाडी,नळ स्टॉप,पुणे.) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रिती जैन या सन 2019 पासून कृषितंत्र विद्यालय मांजरी येथे कृषी सहाय्यक म्हणून काम करत आहेत. कोविड काळात प्रिती जैन यांना नोकरीनिमित्त मांजरी येथे ये-जा करावी लागत असल्याने त्यांचे पतीही त्यांच्यासोबत येत असत. याच काळात विनोद जैन यांची ओळख अतुल पवार व संतोष काकडे याच्याशी झाली. पवार याचा पुणे–सोलापूर महामार्गावरील मांजरी येथे बिल्डिंग मटेरियल पुरवठ्याचा व्यवसाय आहे. एके दिवशी दुकानात चर्चा सुरू असताना संतोष काकडे याने विनोद जैन यांना आपण पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सिमेंट व स्टीलचा पुरवठा करीत असल्याचे सांगितले.

यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असे आमिष दाखवून पवार याने जैन यांना गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला जैन दाम्पत्याने सावध पवित्रा घेतला होता. परंतु त्यानंतर काकडे याने कमी दरात सिमेंट पुरवठा करून काही व्यवहार व्यवस्थित पूर्ण केले. त्यामुळे जैन यांचा त्याच्यावर विश्वास बसला. मोठा नफा मिळतो आहे हे लक्षात घेऊन जैन दाम्पत्याने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

Police register fraud case after a couple from Pune alleged ₹3.78 crore cheating in the name of investment in cement and steel supply for the Pune Metro project.
Pune Crime: कापूरहोळ येथे उद्योजकाच्या मुलाचं अपहरण,सिनेस्टाईल पाठलाग अन् सुटका, अपहरणकर्ते फरार

सुरुवातीला काही लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. ऑगस्ट ते सप्टेंबर 2020 या कालावधीत जैन दाम्पत्याने विविध व्यवहारांतून 27 लाख 87 हजार 500 रुपये गुंतवले. या बदल्यात सुरुवातीला आरोपींनी सुमारे 4 लाख रुपयांचा नफा दिला. सप्टेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत त्यांनी 2 कोटी 54 लाख 95 हजार रुपये गुंतवले.या गुंतवणुकीवर 66 लाख रुपये नफा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Police register fraud case after a couple from Pune alleged ₹3.78 crore cheating in the name of investment in cement and steel supply for the Pune Metro project.
Iranian Citizens In Pune : पुण्यात इराणी नागरिक किती? 30 महिलांनी केलाय पुणेकरांशी विवाह!

एकूण व्यवहार 3 कोटी 21 लाख रुपयांपर्यंत पोहोचला. सुरुवातीला आरोपींनी जैन दाम्पत्याला 1 कोटी 55 लाख रुपये परत दिले. परंतु उर्वरित 1 कोटी 66 लाख रुपये देण्याबाबत टाळाटाळ सुरू केली,पैसे मागितल्यवर जैन दाम्पत्यावर दबाव आणण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात सावकारीची खोटी तक्रार देण्याची धमकी देत शिवीगाळ केली. यामुळे आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येताच जैन दाम्पत्याने अखेर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संतोष सुरेश काकडे व अतुल पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com