

Pune Wari Traffic : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे गुरुवारी (ता. ९) पुणे शहरात एकत्रित आगमन होत आहे. या सोहळ्यादरम्यान शहरातील वाहतूक सुरक्षित आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून गुरुवारी पहाटेपासूनच पालखी आगमन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्ण बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग :
आळंदी येथून निघून वडमुखवाडी, चऱ्होली फाटा, दिघी मॅगझीन, बोपखेल फाटा, कळस, विश्रांतवाडी, फुलेनगर, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट चौक, संचेती हॉस्पिटल, सिमला ऑफीस चौक, नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक, संत श्री तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, गरवारे पुलावरून खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर चौक, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ चौकी, डोके तालीम चौक मार्गे पालखी विठोबा मंदिर (भवानी पेठ) येथे मुक्कामासाठी येईल. या मार्गावरील बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी चौक हा रस्ता गुरुवारी पहाटे तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत अंतर्गत वाहतुकीसाठी बंद राहील.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग :
श्री विठ्ठल मंदिर आकुर्डी मुक्कामाहून गुरुवारी निघून चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी, वाकडेवाडी, पाटील इस्टेट चौक, संचेती हॉस्पिटल चौक, सिमला ऑफीस चौक, नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक, संत श्री तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, गरवारे पुलावरून खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर चौक, सोन्या मारुती चौकमार्गे नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी पोहोचेल. या मार्गावरील बोपोडी चौक ते चर्च चौक आणि अंतर्गत रस्ते पहाटे तीन ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहतील. मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रस्ता जंक्शन, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट आणि नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक हे मार्ग गुरुवारी पूर्णपणे बंद राहतील.
विश्रांतवाडी परिसरासाठी : बोपखेल फाट्याकडून येणाऱ्या वाहनांनी धानोरी रस्त्याने व अंतर्गत मार्गाने इच्छित स्थळी जावे.
मुंबई-पिंपरी बाजूकडून येण्यासाठी : बोपोडी चौकातून भाऊ पाटील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ब्रेमेन चौक (औंध) मार्गे पुणे शहरात प्रवेश करावा.
नगर व येरवडा बाजूकडून : सादलबाबा दर्गा चौकातून पर्णकुटी चौक, बंडगार्डन पूल, जहाँगीर चौक किंवा गुंजन चौक मार्गे प्रवास करावा.
पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिंड्यांसाठी पर्यायी मार्ग-
१. आळंदीकडून गुरुवारी येणाऱ्या दिंड्यांच्या वाहनांनी आळंदी- मरकळ- तुळापूर- फुलगाव- लोणीकंद- वाघोली- लोहगाव मार्गाचा वापर करावा.
२. इंदिरानगर, दत्तनगर, मरिआई गेटकडे जाणाऱ्या वाहनांनी साप्रस चौकी जंक्शन, चंद्रमा चौक, सादलबाबा दर्गा-पर्णकुटी चौक मार्गाचा वापर करावा.
फर्ग्युसन रस्त्यावरील बंदोबस्तादरम्यान सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप चौक व म्हात्रे पूल या मार्गांचा वापर करावा. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद असताना जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात येईल.
१. शहरात पालखी मुक्कामाच्या काळात गुरुवारी दुपारी तीन ते शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (स.गो. बर्वे चौक ते स्वारगेट) आणि लक्ष्मी रस्ता (संत कबीर चौक ते बेलबाग चौक) सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहील.
२. पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिरासमोरील रस्त्यांवर वाहनांना ये-जा करण्यास आणि पार्किंग करण्यास मनाई असेल.
३. पालखी दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या दुचाकी वाहनांसाठी पंडित नेहरू रस्ता, गणेश रस्ता आणि पॉवर हाऊस येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
४. पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस आणि उप-रस्त्यांवर १०० मीटर अंतरापर्यंत ‘नो पार्किंग’ लागू राहील.
५. पालखी पुढे गेल्यानंतर रस्ते टप्प्याटप्प्याने खुले केले जातील.
६. अधिक माहिती व मदतीसाठी नागरिकांनी वाहतूक नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६६८५००० किंवा ०२०- २६६८४००० या क्रमांकावर संपर्क साधावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.