​Pune water crisis : पुणेकरांची तहान भागवण्यासाठी थेट विदेशी तंत्रज्ञान; महापालिका करणार 'कृत्रिम पावसाचा' प्रयोग ?

artificial rain News : पुणे महानगरपालिकेने आता एका अत्यंत वेगळ्या आणि धाडसी पर्यायावर विचार सुरू केला असून, धरण क्षेत्रात थेट 'कृत्रिम पाऊस' पाडता येईल का, याबाबत प्रशासनाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
pmc
pmcsarkarnama
Published on
Updated on

Pune News : मान्सूनचे आगमन होऊनही पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने पुणेकरांवर पाण्याचे मोठे संकट ओढावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने आता एका अत्यंत वेगळ्या आणि धाडसी पर्यायावर विचार सुरू केला असून, धरण क्षेत्रात थेट 'कृत्रिम पाऊस' पाडता येईल का, याबाबत प्रशासनाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

या प्रयोगासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी पक्षनेत्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देशात किंवा परदेशात कोणती नामांकित संस्था काम करते, हा प्रयोग पुण्यात करणे किती फायदेशीर ठरेल आणि यासाठी किती खर्च येईल, याचा संपूर्ण सविस्तर तपशील आणि कृती आराखडा प्रशासनाने लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या आहेत.

pmc
PMC News : पुणे महापालिकेच्या पाणीपट्टीवरून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; PMC वर पडलाय मोठा आर्थिक भार

सध्या पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये केवळ ३.६० टीएमसी एवढाच जिवंत पाणीसाठा शिल्लक असून, तो पुणेकरांना पुढील अवघे दोन महिनेच पुरू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आता भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या पूर्व पुण्यातही पाणी कपात लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

pmc
PMC: मंत्री विखे पाटलांचा पुणे महापालिकेला दणका : बिलावरून फडणवीसांकडे तक्रार केली तरी सूट नाही!

दुसरीकडे, आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा 9 आणि 10 जुलै रोजी पुणे शहरात मुक्कामी असणार आहे. या दोन दिवसांसाठी शहरातील पाणी कपात पूर्णपणे स्थगित करण्यात येणार असून, वारीच्या काळात संपूर्ण पुण्यात 24 तास पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महापौर नागपुरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

pmc
Pune Water Crisis : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पुढील आठवड्यापासून 'एक दिवसाआड' पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव!

एकीकडे वारीसाठी प्रशासनाने कंबर कसली असली, तरी पुणेकरांची यंदा कमी पावसामुळे निर्माण होण्याची शक्यता असणारे पाण्याची टंचाई मिटवण्यासाठी महापालिकेचा हा 'कृत्रिम पावसाचा' प्रयोग यशस्वी होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

pmc
Maharashtra Water Crisis : महाराष्ट्रात पाणी संकट भीषण! टँकरद्वारे राज्यातील 22 लाख नागरिकांची भागवली जातेय तहान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com