PMC: मंत्री विखे पाटलांचा पुणे महापालिकेला दणका : बिलावरून फडणवीसांकडे तक्रार केली तरी सूट नाही!

Radhakrishna Vikhe Patil, Pune Water Bill, Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या १२०० कोटी रुपयांच्या थकीत पाणी बिलावरून जलसंपदा विभाग आक्रमक झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियमांमध्ये कोणतीही सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune Water Bill: राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर आता जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिका आमनेसामने आले आहेत. पुणे महापालिकेला पाठवलेल्या तब्बल १२०० कोटी रुपयांच्या थकीत बिलावरून सध्या पडद्यामागे मोठा वाद पेटला आहे.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आज पुण्यात सिंचन भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत "पुणे पालिकेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जरी तक्रार केली, तरी त्यावर केवळ सकारात्मक निर्णय होईल, पण नियमात सूट मिळणार नाही'' असं ठणकावून सांगितलं. ''१६ टीएमसीचा कोटा असताना २४ टीएमसी पाणी उपसायचं आणि वरून आरोप करायचे, हे चालणार नाही," अशा स्पष्ट शब्दांत विखे पाटलांनी पुणे महापालिकेचे कान टोचले आहेत.

Radhakrishna Vikhe Patil
Maharashtra Politics Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांनी आज पुण्यात कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्रातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील पाणी परिस्थितीचा संपूर्ण एक्झिट पोलच समोर आला. सध्या राज्यातील धरणांमध्ये केवळ २५ टक्के (३५७.५ टीएमसी) उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने चिंतेचे वातावरण आहे. नाशिकमध्ये २६ टक्के तर मराठवाड्यात २८ टक्के पाणी शिल्लक असल्याने विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना 'हाय अलर्ट' जारी केला आहे.

'नो कपात', पण उधळपट्टी थांबवा!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ८५ लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतचा कोटा राखीव ठेवण्याचे आदेश विखे पाटलांनी दिले आहेत. खडकवासला धरण साखळीत सध्या ४.४१ टीएमसी पाणी असून ते ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल, असा दावा त्यांनी केला. "आम्ही कोणतीही अधिकृत पाणी कपात जाहीर केलेली नाही. पण अल निनो आणि मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश दिले आहेत" असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, धरणांमधील पाणी चोरी आणि बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी आता महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाचे 'जॉइंट स्कॉड' मैदानात उतरणार असून थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

Radhakrishna Vikhe Patil
Maharashtra Politics Live Update : मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

१२०० कोटींचे बिल आणि पालिकेचा 'पाणी गेम'

जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला पाठवलेले १२०० कोटींचे बिल म्हणजे केवळ दंड आणि व्याजासकट असलेली अधिकृत थकबाकी आहे. कोणतीही अतिरिक्त आकारणी जलसंपदा विभागाने केलेली नाही मात्र महापालिकेकडून बिल थकवली जात आहेत त्यामुळे पालिकेच्या या मनमानी कारभारावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी उद्याच पुणे पालिका आयुक्तांची भेट घेणार असून, विखे पाटील यांनी स्वतः देखील आयुक्तांशी संवाद साधून विभागाची कडक भूमिका कळवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com