गृहमंत्र्याच्या नावानं पुण्यातील महिलेला दहा लाखांचा गंडा

फाईल मंजुरीसाठी सतेज पाटील यांच्या पीएला कमिशन द्यावे लागेल, असे सांगण्यात आले.
गृहमंत्र्याच्या नावानं पुण्यातील महिलेला दहा लाखांचा गंडा
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई : गृह राज्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन पुण्यातील एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबधीत महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. कामोठे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचे नाव वापरून पुण्याच्या व्यावसायिक महिलेची तब्बल 10 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सुजाता चंद्र असे या महिलेचं नाव आहे.

आपल्या व्यवसायासाठी सुजाता चंद्र यांना मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज होती, मात्र कर्ज उपलब्ध होत नसल्याने त्या विविध ठिकाणी प्रयत्न करीत होत्या. यातच त्यांची ओळख विनायक पाटील नावाच्या व्यक्तीशी झाली.

विनायक याने आधी इन्व्हेस्टर मार्फत कर्ज मिळेल असे सांगितले. त्यानंतर त्यासाठी कमिशन लागेल, असे सांगत त्याने सुजाता चंद्र यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. मात्र कागदपत्रात त्रुटी सांगत कर्ज मजूर झाले नसल्याचे सांगितले. यानंतर एका एनजीओ च्या 60 एकर जमिनीवर कर्ज मिळेल, त्याची फाईल राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी गेल्याचे सांगण्यात आले.

गृहमंत्र्याच्या नावानं पुण्यातील महिलेला दहा लाखांचा गंडा
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला ; दोन गोळ्या झाडल्या

फाईल मंजुरीसाठी देखील सतेज पाटील यांच्या पीएला कमिशन द्यावे लागेल, असे सांगून भोसले नावाच्या व्यक्ती मार्फत फोन करून फाईल मंजूर झाली असून यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. यावेळी सुजाता यांनी 10 लाख रुपये कमिशन म्हणून दिले. मात्र तरी तात्काळ लोन होत नसल्याने त्यांना संशय आला.

गृहमंत्र्याच्या नावानं पुण्यातील महिलेला दहा लाखांचा गंडा
Presidential Election : भाजपकडून 'या' दोन नेत्यांच्या नावांची चर्चा..

त्यांनी विनायक पाटील यांचे घर गाठले परंतु पत्ता चुकीचा होता आणि नावही विनायक पाटील नसून विनायक रामगुडे असल्याचे समजले. यानंतर सुजाता यांनी कामोठे पोलिस ठाणे गाठत या घटनेची तक्रार दाखल केली. कामोठे पोलिसांनी विनायक रामगुडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कामोठे पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com