Yavat Clash : "पडळकरांचे भाषण, नालायकपणा झाकण्यासाठी..."; शरद पवारांच्या नेत्याचा यवत दंगलीबाबत खळबजनक दावा

Pune district violence : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये दोन गटात शुक्रवारी (ता.01) मोठा राडा झाला. दोन्ही गट आमने-सामने येऊन मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ झाल्याने यवतमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
Gopichand Padalkar, Sharad Pawar
Yavat village witnessed intense violence with stone pelting and arson following political speeches. Communal tension has gripped the regionSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 02 Aug : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये दोन गटात शुक्रवारी (ता.01) मोठा राडा झाला. दोन्ही गट आमने-सामने येऊन मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ झाल्याने यवतमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.

याआधी दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची 'हिंदू आक्रोश मोर्चा' नावाची सभा यवतमध्ये झाली होती. या सभेमध्ये भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भाषण केली असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.

त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी महायुती सरकारवर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थावर भाष्य केलं.

यावरून आता फडणवीसांवर विरोधक टीका करताना दिसत आहेत. महबूब शेख म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि भाजपची ही नीती आहे की खांद्यावर हात टाकायचा आणि त्याचाच केसाने गळा कापायचा. आधी एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम भाजपने लावला आणि त्यानंतर आता पुण्यात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देखील कार्यक्रम लावला आहे.

Gopichand Padalkar, Sharad Pawar
Ajit Pawar Hinjawadi Sarpanch Clash : "विकासकामांना विरोध नाही पण ते फक्त आयटीवाल्यांचं..."; अजितदादांनी झापलेल्या हिंजवडीच्या सरपंचांनी अखेर आपली बाजू मांडलीच

सुरुवातीला सोबत घ्यायचं आणि नंतर त्याला संपवायचं यालाच तर भारतीय जनता पार्टी म्हणतात अशी टीका टीका मेहबूब शेख यांनी केली. यवतमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ज्या व्यक्तीने केली त्याच्यावर सरकारने कठोरातली कठोर कारवाई करण्यापेक्षा आहे. त्याच्यावर देशद्रोह, मकोका आणि इतर कठोर कायद्यान्वये कारवाई होणं अपेक्षित आहे.

मात्र, अशा घटना घडत असताना सरकारी पक्षातील लोकांचं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात हे काम आहे. त्या सरकारमधील एक आमदार त्या ठिकाणी जाऊन एका समाजाला टार्गेट करून भाषण देतात. त्यामुळे या सरकारला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Gopichand Padalkar, Sharad Pawar
Prithviraj Chavan: विजनवासात गेलेले पृथ्वीराज चव्हाण शिवसैनिकांमुळे पुन्हा चर्चेत; शिवसेनेचा मुंबईत आक्रमक मोर्चा

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच एक सरकारमधील मंत्री हा रमी खेळत आहे. तर दुसरा विवस्त्र होऊन पैशाच्या बॅगा घेऊन बसला आहे. आमदार फायटिंग करत आहेत. त्यामुळे या सर्व नालायकपणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हिंदू-मुस्लिम दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्याच पक्षाचे आमदार जाऊन चिथावणी खोर भाषण देतायत हे दुर्दैव आहे, असंही शेख यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com