Nilesh Ghare attack
Nilesh Ghare attackSarkarnama

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! युवासेनेच्या जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, मध्यरात्री गोळीबाराचा थरार

Youth Sena Leader Nilesh Ghare attack : पुण्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातील एकनाथ शिंदे गटाचे युवासेना पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. घारे यांच्या वाहनावर वारजे माळवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला.
Published on

Pune News, 20 May : पुण्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातील एकनाथ शिंदे गटाचे युवासेना पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे.

निलेश घारे यांच्या वाहनावर वारजे माळवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. या घनटेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील वारजे माळवाडी परिसरामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारेंच्या वाहनावर रविवारी (ता.19) रात्री 12 च्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला.

Nilesh Ghare attack
Jayant Narlikar : 'विज्ञाना'ची गंगा घरोघरी पोहचवणारा 'खगोलऋषी' हरपला, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड

सुदैवाने या हल्ल्यात निलेश घारे हे बचावले आहेत. पोलिस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, वारजे माळवाडी येथील गणपती माथा परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा गजबजलेल्या ठिकाणी आरोपी गोळीबार करण्याच धाडस करत असतील तर त्यांना पोलिसांचा (Police) धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com