ZP Elections Update : महापालिकेसाठी मतदान सुरू असतानाच अजित पवारांनी जिल्हा परिषदेसाठी डाव टाकला; कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र!

Ajit Pawar Pune ZP Elections : महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना अजित पवारांनी जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली आहे. त्याची सुरुवात बारामतीमधून करण्यात आली आहे.
Pune ZP Elections Ajit Pawar
Pune ZP Elections Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Strategy : महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच अजित पवार हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे अवघ्या 20 दिवसांच्या कालावधीमध्ये उमेदवार निवडीपासून ते फाॅर्म दाखल करून प्रचारा यंत्रणा राबवायची आहे. त्यामुळे महापालिकांसाठी निवडणूक होत असताना अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसंदर्भात कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

अजित पवारांनी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करताना फॉर्म भरण्यापासून ते आचारसंहितेच्या पालनापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या.आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामं उभी करण्याचा संकल्प कार्यकर्ता मेळाव्यात केला.

विकासकामांच्या जोरावर या निवडणुकीच्या समोर जाण्याचा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे यावेळी देखील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढली तर त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे.

Pune ZP Elections Ajit Pawar
BJP Politics : उपनगराध्यक्षपदासाठी भाजपची राजकीय खेळी, स्वीकृतसाठी नामनिर्देशन दाखलच करू दिले नाही?

पुणे जिल्ह्यात अजित पवारच 'दादा'

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूक नुकतीच पार पडली. पुणे जिल्ह्यातील 17 नगरपंचायतीपैकी 10 नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात अजित पवारच दादा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्यासमोर प्रामुख्याने भाजपचे आव्हान असणार आहे.

Pune ZP Elections Ajit Pawar
Voting Ink Controversy : मतदानाच्या शाईवर वाद; पुण्यात थिनरने शाई पुसण्याचा प्रकार, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com