Pune ZP elections : दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटलांचं एकत्र येणं इच्छुकांना रुचेना, संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये नाराजीचं वातावरण, पक्षाने एक डाव राखून ठेवला

Pune Zilla Parishad elections 2026 : इंदापूर तालुक्यातील बंडखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तालुक्यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे एकत्र येणे अनेक कार्यकर्त्यांना मान्य नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांची उमेदवारीदेखील भरणे हर्षवर्धन यांच्या आघाडीमुळे अडचणीत आली आहे.
Leaders from Pune district seen during political meetings amid rising dissatisfaction within the NCP ahead of Zilla Parishad elections and ongoing party defections.
Leaders from Pune district seen during political meetings amid rising dissatisfaction within the NCP ahead of Zilla Parishad elections and ongoing party defections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 21 Jan : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे पुणे जिल्ह्यात जोर धरू लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली असून, अधिकृत उमेदवारी करता दिले जाणारे एबी फॉर्म शेवटच्या दिवसापर्यंत राखून ठेवले असून अखेरीच्या क्षणी ते उमेदवारांना देण्यात येणार आहेत.

त्यामुळे उमेदवारांनीही हुशारी दाखवत एबी फॉर्म नसतानाही अनेक ठिकाणी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजची बंडखोर उमेदवारांची संख्या आणखी वाढणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत घडलं तेच आता परत घडताना पाहायला मिळत आहे.

जोरदार पक्षांतर सुरू झाला आहे. शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करत आजी माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर पुरंदर तालुक्यात शरद पवार गटाचे नेते सुदाम इंगळे यांचे पुतणे कैलास इंगळे हे भाजपच्या वाटेवर आहेत.

Leaders from Pune district seen during political meetings amid rising dissatisfaction within the NCP ahead of Zilla Parishad elections and ongoing party defections.
Kalyan Dombivli Mayor Election : महापौर निवडीआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दोन नगरसेवक मनसेत तर दोन नॉट रिचेबल...

जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील आज पक्ष प्रवेश झाले. शिरूरमध्ये शरद पवार गटाचे राहुल करपे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष बदला बदलीमुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले जाणारे एबी फॉर्म देताना सर्वच राजकीय पक्षांनी घाई न करता शेवटचा दिवस निवडला आहे.

युती आणि आघाडीमुळे काही तालुक्यांमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. आज भोरमध्ये एकाच गटातून विक्रम खुटवड आणि चंद्रकांत बाठे या अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. इंदापूर तालुक्यातील बंडखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तालुक्यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे एकत्र येणे अनेक कार्यकर्त्यांना मान्य नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांची उमेदवारीदेखील भरणे हर्षवर्धन यांच्या आघाडीमुळे अडचणीत आली आहे.

Leaders from Pune district seen during political meetings amid rising dissatisfaction within the NCP ahead of Zilla Parishad elections and ongoing party defections.
Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचा पराभव जिव्हारी, प्रताप सरनाईकांनी मनातील खंत बोलून दाखवली, 'मराठी-अमराठी वादाचा...'

राष्ट्रवादीच्या गटांमध्ये नाराजी वाढली

शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जिल्ह्यातील अनेक राजकीय दृष्ट्या या शरद पवार गटाने घेतले आहेत. यामध्ये शिरूर तालुक्यातील कवठे यमाईची जागा शरद पवार गटाने घेतले नाही. तेथे अजित पवार गटाचे राजेंद्र गावडे नाराज झाले. त्यांनी पक्ष बदलला. मुळशी तालुक्यात पिरंगुट गटामध्ये शरद पवार गटाचे अण्णा कोंढरे यांना जागा मिळाली, त्यामुळे अजित पवार गटाचे शांताराम इंगवले नाराज आहेत.

भोरमध्ये बोलावडे गट शरद पवार गटाकडे गेला आहे. पुरंदरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांचे पुत्र गौरव कोलते यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली, त्यामुळे त्यांच्याच पक्षाचे सुदाम इंगळे यांच्यासह अजित पवार गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांची उमेदवारी कट झाली आहे. हे नाराज उद्या कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com