Pune zilla parishad : 'मॅडम'ला पुणे ZP वर भरोसा नाही काय? बांधकाम खात्याच्या सभापतींनीच आणला बाहेरचा 'आर्किटेक्ट'

Zilla Parishad Interior Private Architect Row : बांधकाम सभापतींनी या व्यवस्थेवर समाधान न मानता स्वतःच्या पसंतीनुसार दालन सजवण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकृत आर्किटेक्ट आणि अभियंत्यांनी प्रयत्नही केले, मात्र त्यांना डावलून थेट खासगी आर्किटेक्ट नेमून दालनाचे इंटेरियर करण्यात आले.
Pune Zilla Parishad
Pune Zilla Parishadsarkarnama
Published on
Updated on

Pune News, 19 Apr : जिल्हा परिषदेमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या दालनांबाबत एक वेगळाच प्रकार समोर आला असून, बांधकाम खात्याच्या सभापतींनी स्वतःचा खासगी आर्किटेक्ट आणून दालनाचे इंटेरियर करून घेतल्याने प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, ज्या विभागाची जबाबदारी स्वतःकडे आहे, त्याच बांधकाम विभागावरच विश्वास नसल्याचे चित्र या निमित्ताने उभे राहिले आहे. वास्तविक, नव्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व दालनांची व्यवस्था आधीच सुस्थितीत केली होती.

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी कोणताही आक्षेप न घेता आपल्या दालनात कार्यभार स्वीकारला. दालनांची सजावट, फर्निचर आणि इंटेरियर हे सर्व नियमांनुसार आणि नियोजित पद्धतीने करण्यात आले होते.

Pune Zilla Parishad
Women Reservation bill:'काँग्रेसवाल्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही..'; शिंदेंचा आमदार महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं भडकला

मात्र, बांधकाम सभापतींनी या व्यवस्थेवर समाधान न मानता स्वतःच्या पसंतीनुसार दालन सजवण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकृत आर्किटेक्ट आणि अभियंत्यांनी प्रयत्नही केले, मात्र त्यांना डावलून थेट खासगी आर्किटेक्ट नेमून दालनाचे इंटेरियर करण्यात आले.

Pune Zilla Parishad
Iran Attacks Indian Ships : होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये पहिल्यांदाच इराणचा थेट भारतीय जहाजांवर हल्ला; सरकारने घेतली मोठी अॅक्शन

ही बाब सर्वसाधारण सभा आणि खातेवाटपानंतर उघड झाली. सभापतींना पदग्रहणासाठी घेऊन गेलेल्या इतर पदाधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. इतर दालनापेक्षा या दालनांतिला इंटेरियर वेगळं होतं त्यामुळे असं कसं घडलं त्यानंतर प्रशासनाकडे चौकशी केली असता, हे काम जिल्हा परिषदेकडून नियुक्त कंत्राटदारामार्फत न होता खासगी पातळीवर केल्याचे स्पष्ट झाले.

मुख्यालयात अशा पद्धतीने खासगी व्यक्तींमार्फत काम करून घेण्यास परवानगी आहे का, तसेच यासाठी निधी कुठून खर्च करण्यात आला, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे जिल्हा परिषदचा कारभार सुरू होताच प्रशासनाची अधिकृत यंत्रणा बाजूला ठेवून ‘खासगी हस्तक्षेप’ वाढत असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com