

खुटबाव (जि. पुणे): दोन महिन्यापूर्वी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीरधवल जगदाळे यांना 'तुला भविष्यात मोठी जबाबदारी देणार आहे,' असा शब्द दिला होता. अजित पवार यांचे निधनानंतर हा शब्द माझ्या मार्गदर्शक उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व पार्थदादा पवार यांनी पूर्ण केला, अशी भावना नवनिर्वाचित अध्यक्ष वीरधवल जगदाळे व्यक्त केली.
विशेष म्हणजे १९ वर्षानंतर दौंड तालुक्याला अध्यक्षपद मिळून देखील अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून जगदाळे यांनी अंगावर गुलाल घेतला नाही तसेच दौंड शहरात विजयी मिरवणूक काढली नाही.
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक असणाऱ्या वीरधवल जगदाळे यांना अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतून थेट सर्वप्रथम रुबी रुग्णालय गाठले. अतिदक्षता विभागात वार्धक्याने आजारी असणाऱ्या ९० वर्षीय मातोश्री दौंडच्या माजी आमदार उषादेवी जगदाळे यांच्या आशीर्वाद घेतले.
विशेष म्हणजे गेली आठ दिवसांपासून जगदाळे हे रुग्णालयात आई सोबत राहात आहेत.त्यानंतर दौंड मधील निवासस्थानी न जाता थेट बारामती गाठले. रात्री ९.३० वाजता अजित पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातील स्मृती स्थळावर जगदाळे नतमस्तक झाले. यावेळी जगदाळे यांना अश्रु अनावर झाले. रात्री ११.०० वाजता आपल्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर कुटुंबीय व मोजक्या कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारत साध्या पद्धतीने जगदाळे यांनी आनंद उत्सव साजरा केला.
जगदाळे यांच्या पुतणी दुर्गादेवी जगदाळे या तीन महिन्यापूर्वी दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीने वीरधवल जगदाळे यांना अध्यक्ष पदाची संधी देत एकाच कुटुंबामध्ये दोन महत्त्वाची पदे दिली आहे. यामुळे दौंड शहर व पुणे जिल्ह्यावर जगदाळे आडनावाची मोहर उमटली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.