

Pune Zilla Parishad Politics: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंडच्या वीरधवल जगदाळे यांची निवड निश्चित झाली आहे. तर, उपाध्यक्ष म्हणून विवेक वळसे पाटील (आंबेगाव) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या नावांवर शिक्कामोर्तब केला. दुपारी दोन वाजता या दोन्ही नेत्यांची औपचारिक निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अजित पवारांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या नेत्याला मिळणार याची उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही उमेदवार हे घड्याळ चिन्हावर लढले होते. त्यामुळे या पक्षातील कोणत्या नेत्याला संधी मिळणार याची देखील चर्चा होती.
राष्ट्रवादी काँग्रसेने आपल्या गटनेते पदी इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड केली होती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षातील नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले होते की गटनेते पदी निवड झालेला नेता अध्यक्ष होईल, असे नाही. त्यामुळे ढोले यांना अध्यक्ष पद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
भाजप आमदाराच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची खेळी :
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इंदापूर, मावळ, भोर, वेल्हा, मुळशी, शिरूर-हवेली तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर दौंड मतदारसंघातील राहुल कुल हे भाजपचे आमदार आहेत. आगामी काळात दौंड मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद वाढण्यासाठी दौंड तालुक्यात अध्यक्षपद दिल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.