

या सभेत सध्या समित्यांविना असलेल्या तीन पदाधिकाऱ्यांना विषय समित्यांचा पदभार देण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन समित्या अशा एकूण सहा समित्यांचे वाटप केले जाईल. यामध्ये अर्थ व शिक्षण, बांधकाम व आरोग्य, तसेच कृषी व पशुसंवर्धन समित्यांचा समावेश आहे.
याच सभेत जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या एकूण ८३ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. नवे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील ही पहिली विशेष सभा असेल. यापूर्वी दोन विशेष सर्वसाधारण सभा अनुक्रमे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या होत्या.
पुणे जिल्हा परिषदेत एकूण दहा विषय समित्या आहेत. यापैकी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दोन समित्या असतात. उर्वरित आठ समित्यांपैकी उपाध्यक्ष आणि इतर दोन सभापतींकडे प्रत्येकी दोन समित्या असतात. तर महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या दोन समित्यांसाठी प्रत्येकी एक सभापती नियुक्त केले जातात.
जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सभापती असतात. उपाध्यक्ष हे अर्थ व नियोजन आणि शिक्षण समित्यांचे सभापती असतात. बांधकाम समितीचे सभापती हे बांधकाम व आरोग्य, तर कृषी समितीचे सभापती हे कृषी व पशुसंवर्धन समित्यांचे सभापती असतात. समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण समित्यांचे सभापती हे आपल्या समित्यांचे प्रमुख असतात.
विषय समित्यांच्या सदस्यपदी निवड होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता विशेष सर्वसाधारण सभा सुरू होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.