Pune Accident News: पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणी राहुल गांधीही संतापले; म्हणाले, "दोन जणांचा जीव घेणाऱ्याला फक्त..."

Pune Porshe Accident News: पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही प्रचंड आक्रमक झालेले असतानाच आता या घटनेचे पडसाद दिल्लीच्या राजकारणातही उमटले आहेत.
Rahul Gandhi On Pune hit And Run Case
Rahul Gandhi On Pune hit And Run CaseSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi On Pune hit And Run Case: पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेही प्रचंड आक्रमक झालेले असतानाच आता या घटनेचे पडसाद दिल्लीच्या राजकारणातही उमटले आहेत. कारण ही घटना पाहून काँग्रेस नेते राहुल गांधी देखील अवाक झाले आहेत. शिवाय या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, 'नरेंद्र मोदी दो हिंदुस्तान बना रहे हैं, जहां न्याय भी दौलत का मोहताज है।' तर या व्हिडिओत बोलताना ते म्हणाले, "नमस्कार मी राहुल गांधी बस ड्रायव्हर (Driver) ट्रक ड्रायव्हर, ओला, उबर आणि ऑटो ड्रायव्हर यांनी जर चुकून एखाद्याला मारलं तर त्यांना 10 वर्षाची शिक्षा होते. परंतु, श्रीमंत घरातील एका 17 वर्षाचा मुलगा दारुच्या नशेत पोर्श कार चालवत दोन जणांचा जीव घेतो तेव्हा त्याला फक्त निबंध लिहायला सांगितला जाता. मग याच न्यायाने ट्रक आणि बस ड्रायव्हर यांना निबंध लिहिण्याची सजा का दिली जात नाही? असा प्रश्न राहिल यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) विचारलं, दोन हिंदुस्तान बनवले जात आहेत का? एक श्रीमंताचा आणि दुसरा गरिबांचा तर ते उत्तर देतात मी सगळ्यांना गरीब बनवू का? पण प्रश्न न्यायाचा आहे. गरिब-श्रीमंत दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आम्ही लडत आहोत." असं राहुल यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे या अपघाताची चर्चा आता देशपातळीवर सुरु झाली आहे.

Rahul Gandhi On Pune hit And Run Case
Pune hit And Run Case: पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणाची गृहमंत्री फडणवीसांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचे दिले आदेश

अर्थात या प्रकरणात दोघांचा जीव जाणं, अल्पवयीन आरोपीला केवळ 15 तासात जामीन मिळणं. यावर पुणेकरांचा आवाजं चढणं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे डोळे उघडणं. यासह उशीरा का होईना पुणे पोलिसांच्या (Pune Police) तपासाची चक्र वेगाने फिरुन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल होणं. तसेच कोझी हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) देणं या सगळ्यामुळे आता या प्रकरणाची झळ संपूर्ण देशात पोहोचल्याचं दिसतं आहे. तर या प्रकरणात सामान्य नागरिकांनी पुणे पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असातनाच, आता राहुल यांच्या ट्विटमुळे पुणे पोलिस प्रशासनावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Rahul Gandhi On Pune hit And Run Case
Pune Hit and Run Case : 'कोझीं' आणि 'ब्लॅक'चे मालक पोलिस कोठडीत रवाना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com