Sanjay Raut: "...तर मी राजकारण सोडेन"; संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान; भाजपला डिवचलं

Sanjay Raut: शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राजकारण सोडण्याची भाषा करत भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे.
Sanjay Raut On PM Narendra Modi
Sanjay Raut On PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राजकारण सोडण्याची भाषा करत भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे. कारण त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं असून मोदींनी जर एका गोष्टीचा पुरावा दिला तर आपण राजकारण सोडू असं त्यांनी म्हटलं आहे.नेमका विषय काय?

Sanjay Raut On PM Narendra Modi
BJP election plan : तब्बल 22 राज्यांमध्ये विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक? मोदी-शहांचा विरोधकांना हादरा देणारा 'प्लॅन'?

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं होतं की, "या देशाला आपल्या संविधानानं लोकशाही दिली आहे. या लोकशाहीची खास बात ही आहे की जो देवेंद्र फडणवीस ज्याला कधी हे देखील वाटलं नव्हतं की तो नगरसेवक बनेल, तो मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला किंवा गुजरातच्या रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा मुलगा देशाचा प्रधानमंत्री बनला. मग ही ताकद भारताच्या संविधानाची ताकद आहे. ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे"

Sanjay Raut On PM Narendra Modi
Gokul Election : गोकुळमध्ये मोठा भूकंप : अवघ्या अर्ध्या तासात निवडणूक अधिकाऱ्याची बदली; अदृश्य शक्तीचा हसन मुश्रीफांना धक्का

आता फडणवीसांच्या याच विधानावरुन संजय राऊत यांनी थेट मोदींना आव्हान दिलं आहे. "मोदींनी चहा विकला होता, हा पुरावा जर कोणी मला आणून दिला तर मी राजकारण सोडेन. पण मोदी ज्या काळात चहा विकत होते असं सांगतात त्या काळात तिथं रेल्वे स्टेशन अस्तित्वाच नव्हतं. "७१ सालातली ही गोष्ट असून कोणीही कसलाही चहा विकलेला नाही. आपण पाहिलं असेल मोदींचे जे फोटो सध्या प्रसिद्ध होत आहेत. लंडन, अमेरिका, फ्रान्स बालवयात टायसूट घालून शाळेत जात आहेत. भाजपनं या दंतकथा पसरवल्या आहेत," अशा शब्दांत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com