पुण्यासाठी राज ठाकरेंची नवी रणनिती; तब्बल साडेतीन हजार ‘राजदूत’ !

मनसेच्या स्थापनेपासूनच ठाकरे यांनी नाशिक आणि पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

ज्ञानेश्‍वर हिंगोलीकर

MNS News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. पुण्यात प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी राज ठाकरे यांनी ‘राजदूत’ ही नवी कल्पना राबविण्याच्या सूचना पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना दिल्या आहेत. पुण्यात एक हजार मतदारांमागे एक याप्रमाणे साडेतीन हजार ‘राजदूत’ नेमण्यात येणार आहेत.

मनसेच्या स्थापनेपासूनच ठाकरे यांनी नाशिक आणि पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुण्यात पहिल्या प्रयत्नातच मनसेचे तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. रमेश वांजळे यांच्या रूपाने एक आमदारही निवडून आला होता. त्यामुळे पुण्याकडून ठाकरे यांना कायमच अपेक्षा असतात. त्यामुळेच येत्या महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ठाकरे यांचे पुण्यात वाढलेले दौरे आणि आता राजदूत नेमण्याची कल्पना पुण्यातच राबविण्यात येत आहे.

Raj Thackeray
नड्डा, शहांचा आदेश डावलला; भाजपच्या पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांना राजदूत नेमण्याबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या संघटनात्मक पातळीवरच्या विभागनिहाय नेमणुका करण्यात येणार आहेत. दरहजारी मतदारांच्या मागे एक राजदूत नेमण्यासाठी आवश्‍यक तयारी करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष बाबर यांनी सांगितले. राजदूत नेमण्यामागे पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीपर्यंत ॲक्टिव्ह राहावा, प्रत्येक मतदारापर्यंत त्याला पोचता यावे, हा मूळ उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

Raj Thackeray
प्रशांत परिचारक आणि राजन पाटील खासदार धनंजय महाडिकांना टाळी देणार का?

राज ठाकरे (Raj Thackeray) साधारण दोन महिन्यांनी पुण्याचा दौरा करतात. पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका घेतात. पक्षाला पुण्यात पोषक वातावरण असल्याने पुण्यात पुन्हा पाय रोवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. शहर संघटनेत मतभेद असले तरी संघटना एकत्र ठेवण्यास अद्यापर्यंत तरी त्यांना यश आले आहे. या पुढचा काळ निवडणुकांचा आहे. महापालिका निवडणुकीनंतर, लोकसभा व विधासभेची निवडणूक आहे. त्यामुळे संघटना बळकट करण्यावर ठाकरे यांचा भर दिसत आहे.

पुण्यात साडेतीन हजार राजदूतांची नेमणूक झाल्यानंतर ठाकरे यांचा मोठा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातूनच ठाकरे यांच्याकडून महाापलिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होईल, असे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसात राजदूत नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ठाकरे यांची मोठी सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com