Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यानंतर महायुतीमधील नेतेमंडळींचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतून येणाऱ्या नेत्याचा ओढादेखील वाढला आहे. त्यामुळे आता येऊ नका म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातूनच महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपाईचे नेते व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत मोठे विधान केले आहे.
आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची मनसेबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसे येत्या काळात महायुतीसोबत येणार अशी चर्चा सुरु असतानाच यावर मोठे विधान केले आहे. महायुतीमध्ये आम्हाला आताच काही मिळत नाही. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला काही मिळणार नाही, त्यामुळे मनसेने महायुतीमध्ये येऊ नये, असे आवाहन आठवले यांनी पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेवेळी बोलताना केले.
राज ठाकरे (Raj Thackeray) माझे चांगले मित्र आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी महायुतीत येऊ नये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने मला डावलले, मात्र मी महायुतीला डावलले नाही. त्यांना ज्या प्रकारे आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सांभाळावे लागतात अगदी त्या प्रकारे मला देखील माझे कार्यकर्ते सांभाळावे लागतात. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला जागा देण्यात याव्यात, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली.
राज्य सरकारला घरचा आहेर
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका पूर्वी लाडक्या बहिणीचे निकष हे शिथील कार्नाय्त आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे कमी असल्याने त्यांनी लाडक्या बहिणीचे निकष कडक केले जात आहेत, असा घरचा आहेर देखील यावेळी आठवले यांनी सरकारला दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात कारवाई अतिशय संथगतीने होत आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अजूनही दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.