Shivsena News : शिवसेनेत थाटात केला प्रवेश; एक दिवसातच नियुक्त्यांवरून उफाळाला असंतोष !

Political Appointments Dispute News : घाईघाईत प्रवेश देण्यात आला, ना नियुक्ती पत्र दिले ना पद यावरून सध्या असंतोष उफाळून आला आहे. त्यांचा रोष थोपवण्यासाठी शनिवारी तातडीची एक बैठक घेण्यात आली.
Ekanth Shinde
Ekanth Shinde sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर आणि विदर्भातील उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. प्रवेश समारंभानंतरच लगेचच पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये नाराजी उफळून आली. घाईघाईत प्रवेश देण्यात आला, ना नियुक्ती पत्र दिले ना पद यावरून सध्या असंतोष उफाळून आला आहे. त्यांचा रोष थोपवण्यासाठी शनिवारी तातडीची एक बैठक घेण्यात आली. सर्वांना प्रतीक्षा करण्याची सूचना केली आहे.

विशेष म्हणजे कोण पक्षात येणार आणि कोणाच्या माध्यमातून येणार याची शेवटपर्यंत कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे ज्यांनी आणले त्यांनाच आता सर्वांची समजूत काढावी लागणार आहे. असे असले तरी आता शिवसेनेत (Shivsena) जुन्या आणि नवे यांच्यातील वादामुळे अंसतोष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ekanth Shinde
Mahayuti News : युतीसाठी आम्ही कोणाच्याही मागे जाणार नाही; शिंदेंच्या मंत्र्याने भाजपला सुनावले

शुक्रवारी शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर शहरातील मेट्रो रेल्वेच्या सभागृहात आणि ग्रामीणमधील कन्हान येथे आभार सभेत अनेकांनी प्रवेश घेतला. शहरातील प्रवेश समारंभाचा कार्यक्रम पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांनी तर ग्रामीणमध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आयोजित केला होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे यांनी कन्हान येथे प्रवेश घेतला.

Ekanth Shinde
Ravindra dhangekar : आमदार धंगेकरांचा गंभीर आरोप; पोलिस भाजपचे कार्यकर्ते, आमदाराने कानाखाली मारलेली...

नागपूरमध्ये मनसेचे माजी जिल्हा प्रमुख व तसेच राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर यांनी शहरात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत ग्रामीणमधील मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे ग्रामीणमध्ये आधीच दोन जिल्हा प्रमुख नियुक्त आहेत. आता दोन माजी जिल्हा प्रमुखांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे कोणाला कुठले पद देणार, कोण कोणाच्या नेतृत्वात काम करणार असा पेच निर्माण झाला आहे. पद देताना मुख्यमंत्र्यांकडे आपल्या समर्थकांसाठी कोण वजन टाकणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Ekanth Shinde
Shivsena UBT : "ठाकरेंच्या शिवसेनेत संवाद नाही, केवळ चाटूकारांची फौज..."; प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केलेल्या तिवारींचा राऊतांसह ठाकरेंवर हल्लाबोल

किरण पांडव पूर्व विदर्भाचे संघटक आहेत. मात्र नागपूर ग्रामीणमध्ये आशिष जयस्वाल आणि आमदार व पक्षाचे उपनेते कृपाल तुमाने हे प्रमुख आहेत. एकाच जिल्ह्यात तीन नेते कार्यरत असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तीनही नेते एकमेकांच्या कामाच हस्तक्षेप करीत नसले तरी त्यांचा आपसात उत्तम संवाद व समन्वय असल्याचे आजवर कधीच आढळून आले नाही. पक्ष समारंभाचा झालेल्या दोन कार्यक्रमावरून हे स्पष्ट होते.

Ekanth Shinde
Bjp News : 'बच्चू कडू विश्वासघातकी, त्यांना महायुतीत घेऊ नये'; भाजपच्या 'या' बड्या नेत्यानं टाकला बॉम्ब

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com