Ramdas Athawale : आता कमळावर लढणार नाही, रामदास आठवलेंच्या 'RPI'ला मिळालं 'हे' नवे चिन्ह

Rpi On Assembly Election 2024 : महायुतीतील घटक पक्ष म्हणून 'आरपीआय' 12 ते 15 जागा मिळाव्यात, अशी मागणी करणार आहे.
Ramdas Athawale.jpg
Ramdas Athawale.jpgsarkarnama
Published on
Updated on

आगामी विधानसभेची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून करण्यात येत आहे. राजकीय पक्षांकडून यात्रा, मेळावे काढून विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा 'आरपीआय' पक्ष देखील मागे राहिला नाही.

रामदास आठवले ( Ramdas Athawale ) 25 ऑगस्टला पुण्यात पक्षाचा महामेळावा घेणार असून यामध्ये मोठ्या घोषणा करणार आहेत. या घोषणा महायुती आणि भाजपची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

त्यासह 'आरपीआयला' अधिकृत चिन्ह नसल्यानं उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढत होते. मात्र, विधानसभेसाठी निवडणूक आयोगानं 'आरपीआय'ला नवीन चिन्ह दिले आहे. त्याचे लोकार्पणही मेळाव्यात होणार आहे.

Ramdas Athawale.jpg
VIDEO : वाघ यांच्यावरून प्रसाद लाड अन् मेहबूब शेख भिडले; तंगडी तोडायची धमकी अन्...

आगामी विधानसभेत 'आरपीआय'ला 12 ते 15 जागा हव्या

महायुतीतील घटक पक्ष म्हणून 'आरपीआय' 12 ते 15 जागा मिळाव्यात, अशी मागणी करणार आहे. तसेच, 'आरपीआय' कोणत्या जागांवर दावा करणार, याचीही घोषणा मेळाव्यातून करण्यात येणार आहे. पुण्यातील वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन जागांवर 'आरपीआय'ने दावा केला आहे. पिंपरीची जागा मिळण्यासाठी 'आरपीआय'चे नेते मागणी करणार आहेत. त्यामुळे आठवले हे महायुतीतील मित्र पक्षांचं 'टेन्शन' वाढवणार असल्याचं बोललं जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला जागा दिल्या नाही, तर आंबेडकर जनतेमध्ये नाराजी वाढेल. त्याचा फटका महायुतीला बसलेला दिसेल, असा इशारा देखील या मेळाव्याच्या माध्यमातून 'आरपीआय' महायुतीला देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Ramdas Athawale.jpg
Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अनिल देशमुखांसाठी चाचपणी?

रामदास आठवले यांचा देखील फोटो वापरा

आगामी विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' गेम चेंजर बनू शकते, असं बोललं जात आहे. मात्र, या योजनेच्या जाहिरात फलकावर रामदास आठवले यांचा फोटो नसल्याने 'आरपीआय'चे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे तातडीने या जाहिरातीवर रामदास आठवले यांचा फोटो वापरावा ही मागणी देखील 'आरपीआय'च्या कार्यकर्त्यांची असणार आहे.

'आरपीआय'ला मिळाले नवीन चिन्ह

मागील काही निवडणुकांत 'आरपीआय' पक्षाकडे आपले अधिकृत चिन्ह नव्हते. त्यामुळे 'आरपीआय'च्या उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवावी लागली होती. मात्र, आगामी विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने 'आरपीआय'ला 'ऊस धारक शेतकरी' हे चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचे अनावरण रविवारी होणाऱ्या मेळाव्यात करण्यात येणार आहे. यापुढील सर्व निवडणुका 'ऊस धारक शेतकरी' या चिन्हावर लढवणार असल्याचे या मेळाव्याच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com