Daund News : आमदार जयकुमार गोरे म्हणतात, ‘रमेशअप्पांना त्यावेळी काहीच कळत नव्हतं’

Jaykumar Gore-Ramesh Thorat News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दौंड तालुक्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय द्यायला मी तयार आहे, अशी घोषणा केली.
Jaykumar Gore-Ramesh thorat
Jaykumar Gore-Ramesh thoratSarkarnama

Daund : सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघातून मी विधानसभेला 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. तेव्हा दौंड तालुक्यातूनही अपक्ष म्हणून रमेश थोरात हे निवडून आले होते. पण त्यावेळी आमदार थोरात यांना प्रश्नही समजत नव्हते आणि काहीच कळत नव्हतं, असे विधान भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे. (Ramesh Thorat did not even understand the questions in 2009 : Jaykumar Gore)

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दौंड तालुक्यासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत गोरे बोलत होते. कार्यक्रमाला माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, दौंडचे आमदार राहुल कुल व पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jaykumar Gore-Ramesh thorat
Assembly Winter Session 2023 : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील समस्यांचा भाजप आमदाराने विधानसभेत वाचला पाढा!

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत मी माणमधून अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. रमेश थोरात हेही अपक्ष म्हणून दौंडमधून निवडून आले होते. पण, आमदार थोरात यांना प्रश्नही समजत नव्हते. त्यांना काहीच कळत नव्हतं. मी तुमचे 2009 चे आमदार आणि आताचे आमदार राहुल कुल यांच्याबरोबरही काम केले आहे. पण, या दोन आमदारांची काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. दोघांमध्ये प्रश्नांची जाणीव यातही मोठा फरक आहे. मतदारसंघातील प्रश्नांची आमदार कुल यांना उत्तम जाण आहे. विकासकामांसाठी ते ताकदीने लढत आहेत, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दौंड तालुक्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय द्यायला मी तयार आहे, अशी घोषणा केली. त्यामुळे दौंडमधील नागरिकांना बाहेर जावे लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, मागील निवडणुकीत आमदार राहुल कुल हे अवघ्या ७४६ मतांनी निवडून आले. पण, आगामी 2024 च्या निवडणुकीत कुल हे 70 हजार मतांच्या फरकाने निवडून आले पाहिजेत, अशी तयारी कार्यकर्त्यांनी करावी.

Jaykumar Gore-Ramesh thorat
Pankaja On Parli Constituency : परळी मतदारसंघाबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे विधान; ‘मला अन्‌ धनंजयला...’

दौंड विधानसभा मतदारसंघ हा सोपा नाही. भोवतालचं वातावरणही तसं आहे. सातत्याने घडणाऱ्या राजकीय उलथापालथी आणि वातावरण बघता येथे काम करण्याचे मोठे आव्हान आहे. दौंड येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास कोणते तालुके जोडायचे, हे आम्ही पाहू. दौंडच्या लोकांना बाहेर जावे लागू नये. इतर लोकांनी दौंडला आले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असेही विखे यांनी स्पष्ट केले.

Jaykumar Gore-Ramesh thorat
Assembly Winter Session : बाळासाहेब थोरातांनी मागणी करताच...मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणाच करून टाकली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com