Assembly Winter Session 2023 : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील समस्यांचा भाजप आमदाराने विधानसभेत वाचला पाढा!

Sanjay Kelkar News : ठाण्यात ८००  विहिरींपैकी ५५५ विहिरी  शिल्लक असून त्यापैकी दीडशे  विहिरी  जुन्या ठाण्यात आहेत.
Sanjay Kelkar
Sanjay KelkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील समस्यांचा पाढा भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत वाचून दाखवला. निधीअभावी शहरातील अनेक कामे ठप्प आहेत. त्यात पाणीटंचाईसारखा महत्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय रस्ते, अनाधिकृत बांधकामे, नाले सफाई एफएसआय यासारख्या विषयाला आमदार केळकर यांनी विधानसभेत वाचा फोडली आहे. (Various works stalled in Thane due to lack of funds : MLA Sanjay Kelkar)

वाढत्या नागरीकरणामुळे ठाण्यात पाणीटंचाईची समस्या नेहमीच भेडसावत असते. यासाठी विहिरींचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. या विहिरींबरोबरच नाले आणि रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी नसल्याची बाब निदर्शनास आणून आमदार संजय केळकर यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

घोडबंदर परिसरात एकीकडे पाणी टंचाई नियमितपणे भेडसावत असताना दुसरीकडे या परिसरात ५०-५० मजल्यांच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या नवीन इमारतींमध्ये राहायला येणाऱ्या हजारो रहिवाशांना पाणी कुठून देणार? कचरा डम्पिंग, रस्ते आदी सुविधा कशा पुरवणार असे प्रश्न आमदार केळकर यांनी उपस्थित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Kelkar
Amruta Fadnavis : बँकर ते मिसेस डेप्युटी सीएम : अमृता फडणवीस

ठाण्यात ८००  विहिरींपैकी ५५५ विहिरी  शिल्लक असून त्यापैकी दीडशे  विहिरी  जुन्या ठाण्यात आहेत. पाणी टंचाईची झळ कमी करण्यासाठी शहरातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. त्यासाठी ५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केळकर यांनी केली.

पावसाळ्यात नाले तुंबून परिसरातील घरांमध्ये पाणी शिरते, त्यामुळे नाल्यांच्या साफसफाईबरोबरच हे नाले खाडीपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. ठाणे शहरातील असे १६ नाले खाडी पर्यंत नेण्याची गरज असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने का होईना निधी मिळावा, असेही त्यांनी नमूद केले.

Sanjay Kelkar
Pankaja On Parli Constituency : परळी मतदारसंघाबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे विधान; ‘मला अन्‌ धनंजयला...’

ढोकाळी-कोलशेत रस्त्याचे काम नऊ महिने बंद होते. त्यामुळे येथे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पाठपुरावा केल्यानंतर हे काम सुरू झाले आहे. मात्र, या रस्त्यात एमएसईबीच्या केबल, ट्रान्सफॉर्मर आदींचा अडथळा असून ते काढून टाकण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. या कामासाठी आयुक्तांनी १२ कोटी रुपयांचा निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाला नाही तर या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होईल, अशी भीती केळकर यांनी व्यक्त केली.

Sanjay Kelkar
Assembly Winter Session : बाळासाहेब थोरातांनी मागणी करताच...मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणाच करून टाकली

एक लाख एफएसआयची चोरी

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात मनमानी कारभार सुरू असून वादग्रस्तरितीने मंजुऱ्या देण्यात येत आहेत. ठाण्यात प्राईम ठिकाणी एक लाख एफएसआयची चोरी करण्यात आली असून त्याला ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबत सुनावणी झाली असून तातडीने स्थगिती देण्याची मागणी केळकर यांनी केली आहे.

पाचपाखाडी येथे सिनेमागृहाला जागा देण्यात आली आहे. मात्र आता तेथे एफएसआय शिल्लक राहिला नसून तेथील सोसायटीतील शेकडो रहिवाशांना पुनर्विकास करता येणार नाही. या प्रकरणी शहर विकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केळकर यांनी केली.

Sanjay Kelkar
Solapur Millet Center : बारामतीला निधी द्या; पण मिलेट सेंटर सोलापुरातच उभारा; देशमुख-शिंदेंची सरकारला विधानसभेत विनंती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com