Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी होणार? समिती आज निर्णय जाहीर करणार

Swabhimani Setkari Sanghatna : राजू शेट्टी यांच्या विरोधात आरोप करणारे रविकांत तुपकर यांच्याविरोधात निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या सदस्यांनी घेतलेला निर्णय आज जाहीर केला जाणार आहे.
Ravikant Tupkar-Raju Shetti
Ravikant Tupkar-Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Pune, 22 July : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक चेहरा रविकांत तुपकर यांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेली शिस्तपालन समिती आज निर्णय जाहीर करणार आहे. तुपकर यांना संघटनेत ठेवले जाते की संघटनेतून त्यांची हकालपट्टी केली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या विरोधात भूमिका घेतली हेाती. राजू शेट्टी यांनी शब्द देऊनही अनेक वेळा मला बुलडाण्याची जागा मिळू शकलेली नाही, असा आरोप तुपकर यांनी केला होता.

शेट्टींनी 2014 मध्ये भाजपसोबत युती केली. त्यावेळी बंडखोरी करू नका, असे सांगितले. त्यानंतर राजू शेट्टींनी मला 2019 मध्ये लोकसभेची तयारी करायले सांगितले. मात्र, जागा न सुटल्याने पुन्हा थांबायले सांगितले. त्या वेळी मला आमदारकीचा शब्द दिला होता. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची चळवळ टिकली पाहिजे म्हणून मी माघार घेतली, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले होते.

तुपकर यांनी 2014 आणि 2019 च्या अनुभवानंतर राजू शेट्टी यांच्यावर गेल्या वर्षी आरोप करत नेतृत्वाला आवाहन दिले होते. दरम्यानच्या काळात त्यांना शिस्तपालन समितीसमोर आपले म्हणणं मांडण्यास सांगितले होते. मात्र, तुपकर यांनी शिस्तपालन समितीसमोर येण्याचे टाळले होते. तुपकर यांनी बुलडाण्यातून लोकसभेची मागील निवडणूकही लढवली होती. त्यात त्यांना अपयश आले.

Ravikant Tupkar-Raju Shetti
Sangola Politics : सांगोल्यात पुन्हा रंगणार भाऊबंदकी...; शहाजीबापूंना डॉ. अनिकेत की बाबासाहेब टक्कर देणार?

राजू शेट्टी यांच्या विरोधात आरोप करणारे रविकांत तुपकर यांच्याविरोधात निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती. त्या कोअर समितीच्या सदस्यांनी घेतलेला निर्णय आज जाहीर केला जाणार आहे. या कमिटीकडून तुपकर यांची संघटनेतून हकालपट्टी होते की त्यांना पुन्हा संघटनेत सामावून घेतले जाते, हे पाहणे महत्वाचे आहे.

दोघांनाही एकमेकांची गरज

लोकसभेच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. तसेच, बुलडाण्यात रविकांत तुपकर यांचाही पराभव झाला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी साथ सोडल्यानंतर संघटनेची ताकद नाही म्हटले तरी कमी झाली आहे. तुपकर यांनाही संघटनेची गरज आहे. तसेच, राजू शेट्टी यांना संघटनेत तुपकर यांच्यासारखा आक्रम चेहऱ्याची गरज आहे, त्यामुळे दोन्ही बाजूंकडून समन्वयाची भूमिका घेतली जाते की टोकाचा निर्णय होणार, याकडे लक्ष असणार आहे.

Ravikant Tupkar-Raju Shetti
Jitesh Antapurkar : क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली भाजप नेत्याची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com