Ravindra Dhangekar News: चंद्रकांत पाटलांच्या एक पाऊल पुढे जात धंगेकरांची गौतमी पाटील अपघात प्रकरणात 'ही' मोठी मागणी

Gautami Patil Car Accident : एक व्यक्ती मृत्यूच्या दारात असताना गौतमी पाटील या त्या कुटुंबाची भेट घेत नाही, त्यांचा उपचाराचा खर्च करत नाहीत. त्या उलट त्या जर इतरत्र त्यांचे शो करत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे.
Ravindra Dhangekar On Gautami Patil .jpg
Ravindra Dhangekar On Gautami Patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला धडक देऊन भीषण अपघात झाला होता. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून त्वरित तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर आता माजी आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी एक पाऊल पुढे जात पोलिसांकडं मोठी मागणी केली आहे.

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शनिवारी (ता.4) रवींद्र धंगेकर यांनी सिंहगड पोलीस ठाण्याला भेट दिली. तसेच या प्रकरणात कशाप्रकारे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे याबाबतची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रवींद्र धंगेकर म्हणाले, या प्रकरणांमध्ये योग्य तसा तपास होत नाही, असं निदर्शनास येत आहे. अपघातात गंभीर जखमी असलेले रिक्षाचालक आपली रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभे करून त्यामध्ये बसले होते. अशा उभ्या असलेल्या रिक्षाला मागून येऊन धडक दिली, म्हणजे नक्कीच चालकाने मद्यप्राशन केलेल्या असावे.

अपघातानंतर त्या ठिकाणी क्रेनचालक कोणाच्या बोलावण्यावरून त्या ठिकाणी आला, तसंच स्थळावरून ती गाडी कशी हलवण्यात आली, या सगळ्या संशयास्पद गोष्टी आहेत. ज्या गाडीने अपघात झाला, ती गाडी गौतमी पाटील यांची आहे.

Ravindra Dhangekar On Gautami Patil .jpg
Ramdas Kadam On BJP: बाळासाहेबांच्या मृत्यूवरुन राजकारण पेटवल्यानंतर कदमांनी उकरुन काढला पुन्हा नवा वाद; फडणवीसांच्या लाडक्या नेत्यावरच संशय

अपघात झाल्यामुळे एक व्यक्ती मरणाच्या दारात असताना नैतिकतेच्या दृष्टीने गौतमी पाटील (Gautami Patil) यांनी त्यांची भेट घेणं आवश्यक होतं. मात्र, तसं झालं नाही. या सर्व प्रकरणांमध्ये प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दृष्टिकोनातून गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे.

एक व्यक्ती मृत्यूच्या दारात असताना गौतमी पाटील या त्या कुटुंबाची भेट घेत नाही, त्यांचा उपचाराचा खर्च करत नाहीत. त्या उलट त्या जर इतरत्र त्यांचे शो करत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व प्रकरणाचा तपास करून गौतमी पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. पाटील जर चुकीचं वागत असेल ,तर त्यांना कायद्याचा बडगा दाखवणे आवश्यक आहे. त्याला कुठेतरी पोलिसांकडून उशीर होत आहे, असा आरोप रवींद्र धांगेकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com