Ravindra Dhangekar News: महायुतीत असूनही भाजपशी पंगा; आता शिवसेनेच्या धंगेकरांची थेट निवडणूक आयोगाकडेच मोठी मागणी

PMC Election 2025 : पुणे महापालिकेचा हा कार्यक्रम असल्यामुळे त्याचे नियोजन आणि निमंत्रण कोणाकोणाला द्यायचं यासंदर्भातील सर्व जबाबदारी ही महापालिकेकडे होती. त्यामुळे निमंत्रण देताना शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना निमंत्रण देण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा बिगुल आता वाजला आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील 3000 कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.

एकप्रकारे यात कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने पुणे महापालिकेच्या निवडणूक (PMC Election) प्रचाराचा शुभारंभ करत 3000 कोटींच्या कामाच्या माध्यमातून मतपेरणीचं केल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी भाजपकडून करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच मुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही काही संख्येने या कार्यक्रमाला आले होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उपसभापती नीलम गोऱ्हे या व्यासपीठावर उपस्थित होत्या. मात्र, त्याखेरीज शिवसेनेचे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते म्हणावे असे या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचे पाहायला मिळालं.

पुणे महापालिकेचा हा कार्यक्रम असल्यामुळे त्याचे नियोजन आणि निमंत्रण कोणाकोणाला द्यायचं यासंदर्भातील सर्व जबाबदारी ही महापालिकेकडे होती. त्यामुळे निमंत्रण देताना शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना निमंत्रण देण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे.

Ravindra Dhangekar
Uddhav Thackeray: गळती थांबता थांबेना, त्यात शिवसैनिकांना मिळवून दिली काँग्रेसची उमेदवारी; संतापलेल्या ठाकरेंनी विभागप्रमुखाला अद्दलच घडवली

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख असलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकरांनाही (Ravindra Dhangekar) या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ते नाराज देखील असल्याचं बोललं जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर एकीकडे हा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी एक महत्त्वाची मागणी केली. कुठेतरी ही मागणी त्यांना कार्यक्रमाला न बोलावल्याच्या नाराजीत न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Ravindra Dhangekar
Balraje Pawar Arrest Update : अटकेनंतर बाळराजे पवारांची कोठडीत रवानगी: गेवराई राड्यातील एक एकेकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची धडपड

मागणी करताना रवींद्र धंगेकर म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. निवडणुका हा लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव असतो. या निवडणुका निपक्ष;पातीपणे व्हाव्यात यासाठी प्रत्येक राजकीय कार्यकर्ता मनापासून प्रयत्न करत असतो.

आज शहरात महापालिका आयुक्त हे कामकाज करत असताना आयोगाचे नियम धाब्यावर बसवून कामकाज करत असल्याचे निदर्शनास येत आहे. पुणेकरांना नि:पक्षपातीपणे निवडणूक कार्यकाळात सक्षम अधिकारी मिळावा यासाठी माझी राज्य निवडणूक आयोगास विनंती आहे की निवडणूक होईपर्यंत नवल किशोर राम यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे. ही मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com