Ravindra Dhangekar News : VIP ट्रिटमेंट अंगलट, आज तीन पिढ्या आत; पैशांची मस्ती फार काळ टिकत नाही; धंगेकरांचा रोख कुणाकडे?

Pune Hit And Run Case : पुण्यातील हिट अॅन्ड रन प्रकरणातील आरोपी सुधारगृहात आहे. तर वडील विशाल अगरवाल न्यायालयीन कोठडी असून आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर पोर्श कार आपघातावरून देशभरातून पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठवली जात आहे. अपघातानंतर श्रीमंताच्या मुलाला पिझ्झा दिला. तसेच फक्त 15 तासांत जामीनही मिळाला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांनी Ravindra Dhangekar आंदोलनाचा पवित्रा घेतला. आता या प्रकरणी आरोपीच्या तीन पिढ्या आतमध्ये असल्याचे सांगून धंगेकरांनी हा नियतीचा खेळ असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

पुण्यातील हिट अॅन्ड रन Hit And Run Case प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने सुधारगृहात आहे. तर अल्पवयीन मुलाला विनाक्रमांक अलिशान कार दिल्याने वडील विशाल अगरवाल Vishal Agarwal यांना पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या नातवाला वाचवण्यासाठी आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनी गाडीचा चालकाला (अपघातावेळी तो बाजूला होता) गुन्हा अंगावर घेण्यासाठी चार दिवस डांबून ठेवले होते. या प्रकरणी सुरेंद्र अगरवाल यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यावरून धंगेकरांनी पैशांची मस्ती जास्त काळ टिकत नसल्याचे म्हटले आहे.

धंगेकरांनी ट्विटमध्ये म्हटले, आठ दिवसांपूर्वी मुलाला पोलिसांकरवी VIP ट्रिटमेंट दिली आणि पैशांच्या जोरावर त्याची थाटात सुटका करून घेतली. आज वेळ अशी आहे की, मुलगा, वडील, आजोबा असे तिघेही आतमध्ये आहेत. हा नियतीचा खेळ आहे. त्यामुळे पैशांची मस्ती फार काळ टिकत नाही, असेही धगेंकरांनी आरोपींसह त्यांना मदत करणारे राजकीय नेते आणि पोलिसांना टोला लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar
Bajrang Sonwane News : बीडमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट; सोनावणेंचं निवडणूक आयोगाला पत्र, जिल्हाधिकाऱ्यांबाबत मोठी मागणी

दरम्यान, रवींद्र धंगेकरांनी या प्रकरणावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. या प्रकरणातून पुण्याची देशभर बदनामी करणारे पोलिस आयुक्तांची बदली करण्याचीही त्यांनी मागणी केली. असे असले तरी आयुक्तांनी हे प्रकरण हाताळणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच मुख्य आरोपींवरही कडक कारवाई करून हे प्रकरण योग्यरित्या हाताळण्यात येत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ravindra Dhangekar
West Bengal Politics : काँग्रेसमध्ये प्रेम, भाजपमध्ये घटस्फोट; मतपेटीत कैद झाले पूर्वीश्रमीच्या पती-पत्नीचे भविष्य...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com