"तिचं वागणं मला काही कळत नाही" : पिडीतेच्या आरोपांवर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

Chitra Wagh | BJP | Raghunath Kuchik | : वाघ यांनी बळजबरीने जबाब द्यायला लावल्याचा पिडीतेचा आरोप
BJP leader Chitra Wagh
BJP leader Chitra WaghSarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath kuchik) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने आज नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले तसेच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला वाघ यांनीच भाग पाडलं, असा गंभीर आरोप पिडीत तरुणीने केला असून सादर केलेले मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचे तरुणीने म्हटले आहे.

संबंधित तरुणीने 'साम टीव्ही'शी बोलताना चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणले, असा पीडितेचा आरोप आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पिडीत तरुणीने केला आहे. त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हंटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोपही या पीडित तरूणीने केला आहे.

BJP leader Chitra Wagh
रघुनाथ कुचिक प्रकरण : वाघ यांनी बळजबरीने जबाब द्यायला लावल्याचा पिडीतेचा आरोप

दरम्यान या आरोपांनंतर चित्रा वाघ यांनी 'साम टिव्ही'शी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांबाबत आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, मी जर तिच्यावर दबाब आणण्यास भाग पाडलं असेल तर यावर मी आणखी काय बोलू? ती हे का बोलते आहे? हेच मला कळत नाही. विद्या चव्हाण या डोक्यावर पडलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. या प्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. कसल्या प्रकारचे गंभीर आरोप माझ्यावर झालेत मला तर काहीच समजत नाही."

BJP leader Chitra Wagh
भाजपला पुन्हा सत्ता अन् मुख्यमंत्र्यांना विजयासाठी झुंजायला लावणारा नेता थेट तुरुंगात

पीडित मुलीला मी फोन केला होता. आपल्याला लढायचे असेल तर काही गोष्टींची तयारी करावी लागेल. मी तिला मदतच केली आहे. आता हे सगळे कशासाठी होतं आहे हे काही मला माहिती नाही. ती मुलगी हे सगळं का करते आहे हे ही मला माहिती नाही. त्या मुलीला न्याय मिळावा ही माझी भूमिका होती. बाकी कोणताही हेतू माझा नव्हता. त्यामुळे जे आरोप होते आहेत त्याला मी उत्तर देईल. मी दबाव आणला असेल तर माझी चौकशी करा. माझी तयारी आहे" असेही वाघ यांनी उत्तर देताना म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com