Nitesh Rane : राणेंचे मंत्रिपद काढून घ्या, आमदारकी रद्द करा! राज्यपालांकडे याचिका दाखल होणार...

Nitesh Rane Minister Post Removal Maharashtra Politics Latest News : आता पुण्यातील ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (उबाठा) माजी खासदार विनायक राऊत राज्यपालांकडे याचिका दाखल करणार आहेत.
Nitesh Rane BJP .jpg
Nitesh Rane BJP .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मंत्री आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे. नितेश राणे करत असलेल्या विधानांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यानंतर देखील राणे यांच्याकडून सातत्याने अशा प्रकारची विधानं सुरु असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता नितेश राणे यांच्या विरोधात राज्यपालाकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच नागपूर येथे दंगल झाली. या पार्श्वभूमीवर काही नेत्यांकडून सातत्याने आक्रमक विधाने येताना पाहायला मिळत आहेत.

भाजप आमदार नितेश राणे हे सातत्याने एका विशिष्ट समाजाविरोधात आक्रमक विधान करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Nitesh Rane BJP .jpg
Kolhapur Bribe Case : तहसीलदार कार्यालयात जमीनी संदर्भातील काम होईना म्हणून RTI कार्यकर्त्याची मदत घेतली अन् त्यानेच घात केला, तब्बल 5 लाखांची...

आता पुण्यातील ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (उबाठा) माजी खासदार विनायक राऊत राज्यपालांकडे याचिका दाखल करणार आहेत. राज्यपालांकडे प्रथमच अशी याचिका दाखल करण्यात येत आहे, असं असीम सरोदे यांचं म्हणणं आहे. ही याचिका दाखल करण्यासाठी आज विनायक राऊत व त्यांचे वकील ॲड. असीम सरोदे आज राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते.

Nitesh Rane BJP .jpg
Nagpur Violence: दंगल घडविण्यास कारण ठरलेला फहिम खानचा Video पोलिसांच्या हाती; राजद्रोहाचा गुन्हा दाखल

या याचिकेच्या माध्यमातून द्वेषपूर्ण बोलणे, विषमता तयार करणे, जाती-धर्मात तेढ निर्माण करणारी विधाने करणे यातून मंत्रिपदाच्या शपथेचा नितेश राणे भंग करत असून नितेश राणे याच्या असंवैधानिक वागून मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केल्याने त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे व आमदारकी रद्द करावी, अशी राज्यपालांकडे मागणी करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com