
Rohit Pawar: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीसह देशातील विविध विधानसभा मतदारसंघात मतं चोरी झाल्याचा आरोप काही कागदपत्रांच्या आधारे केला. त्यानंतर देशभरात यावरुन बरीच खळबळ माजली. याच धर्तीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील काही बोगस मतदारांचे खुलासे केले आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातील हे प्रकरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. यात ते म्हणतात, मतदार यादीत बोगस नावं कशा प्रकारे घुसवली जातात याचं सविस्तर प्रेझेंटेशन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच केलं. राज्यात याचा नमुना बघायचा असेल तर शिरुर विधानसभा मतदारसंघातील काही संशयित मतदारांची शहानिशा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक बापू पवार यांनी निवडणूक आयोगाकडं केली होती. याच्या पडताळणीनंतर मतदार दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचं निवडणूक आयोगानं मान्य केलं. मात्र, त्याची नोंद कशी झाली? याबाबत हात झटकले आणि याचं खापर ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेवर फोडलं.
धन्य तो निवडणूक आयोग आणि धन्य ती मतदार नोंदणी प्रक्रिया!
एक बरं झालं, संबंधित मतदार दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचं तरी निवडणूक आयोगानं मान्य केलं. पण राज्यभरात असे बनावट मतदार किती असतील, याची जबाबदारी कोण घेणार? असे सवालही यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मध्य बंगळुरु लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीतील घोटाळ्यांबाबत माहिती दिली. या लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होते. यांपैकी ४ विधानसभा क्षेत्रांमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर होता तर भाजपचा पिछाडीवर. पण पाचव्या महादेवपूर मतदारसंघात भाजपला तब्बल १ लाख २४ हजार मतांची आघाडी मिळाली आणि हा उमेदवार निवडून आला. पण या एकाच मतदारसंघात इतकी लीड कशी मिळाली तर ती बोगस मतांच्या आधारे मिळाली असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
यामध्ये संबंधित मतदारसंघात वनरुम किचन असलेल्या एका घराच्या पत्त्यावर ८० लोकांची नाव नोंदवली गेली. तसंच काही वयस्कर महिलांनी नवमतदार म्हणून नोंदणी करुन मतदान केलं. तसंच अलोक श्रीवास्त्व नामक व्यक्तीनं पाच विविध मतदारसंघात नाव नोंदणी असल्याचं दाखवून दिलं. तसंच इतरही अनेक जणांचे फोटोच व्यवस्थित दिसत नाहीत, पत्तेच चुकीचे आहेत, काहींचे नाव चुकीची आहेत, असे घोळ त्यांनी सप्रमाण मांडले. तसंच या सर्व प्रकारांमध्ये मतांची मोठ्या प्रमाणावर चोरी करण्यात आली त्यामुळेच भाजप लोकसभा निवडणूक जिंकली असा दावाही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.