Maharashtra Politics : गोपीचंद पडळकरांच्या नंतर हाकेही आमदार होणार फडणवीस यांनी दिले टार्गेट? शरद पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

Rohit Pawar Gopichand Padalkar Laxman Hake : लक्ष्मण हाके हे सातत्याने पवार कुटुंबाला टार्गेट करत आहेत. तसे करायला त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. हाके यांना पवारांवर बोलण्याचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, लक्ष्मण हाके यांचे काही चुकत नाही ते त्यांच्यापुढे उदाहरण भाजप आमदार गोपीचंद पडळकर ठेवतात. सुरुवातीला गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन हे धनगर समाजासाठी केलं होतं. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी इतर बांधवांसोबत त्यांनी आंदोलन उभारलं होतं ते चांगलं होतं . त्यावेळी त्यांनी शपथ घेतल्याचं सांगितलं जातं की भाजप आपल्याला आरक्षण देणार नाही त्यामुळे त्या पक्षात मी जाणार नाही असं देखील ते म्हणाले होते.

'देवेंद्र फडणवीस यांची सवय आहे की, बहुजन समाजाचे नेते आपल्याकडे घ्यायचे आणि त्यांना शरद पवारांच्या विरोधी बोलायला लावायचं. त्यासाठी त्यांना मंत्रिपदाच आमिष दाखवायचं. त्याचप्रमाणे पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आले आणि शरद पवार यांच्या विरोधात बोलायला लागले. आता ते भाजपाच्या दृष्टीने मोठे नेते झाले आहेत. आणि त्याचा कार्य बद्दल त्यांना आता आमदारकी देण्यात आली आहे. हाके यांना पडळकर यांच्याप्रमाणेच बनायचं असल्याने ते पवारांच्या विरोधात बोलत आहेत.', असे रोहित पवार म्हणाले.

Laxman Hake
Shivsena UBT Politics : गोकुळमधील भ्रष्टाचाराच्या भानगडी थांबवून मंत्री मुश्रीफांनी लेखी उत्तर द्यावे, ठाकरेंची सेना आक्रमक

'सत्तेतील लोकांना बाजूला ठेवायाचं आणि आमच्यावर बोलयचं, देवेंद्र फडणवीस यांनी हाकेंना सांगितला असेल तुम्ही पवारांच्या विरोधात बोला पडळकरांप्रमाणे तुम्हाला देखील आमदार करतो त्यामुळे हाके भाजपची भाषा बोलत आहेत.' अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

मराठा आंदोलनानंतर सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआर नंतर मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटण्याची करण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, सर्व समाजाला विश्वासात घेऊन मार्ग काढणे आवश्यक आहे. मात्र यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे हे कुठ ही दिसत नाही. जाहिरातीत फक्त देवा भाऊ दिसत आहेत. मराठा -ओबीसीमधील आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर संसदेत मार्ग निघू शकतो, कायदा करण्याची गरज आहे.

Laxman Hake
Sharad Pawar Nashik Morcha : रोहित पवारांचं जबरदस्त नियोजन, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 50 हजार शेतकरी उतरणार रस्त्यावर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com