Rohit Pawar News : भावी मुख्यमंत्र्याच्या 'त्या' बॅनरच्या चर्चेनंतर रोहित पवारांची सावध भूमिका

NCP Politics : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल नाका येथे लागलेल्या त्यांच्या भव्य अभीष्टचिंतनाच्या बॅनरची सध्या मोठी चर्चा आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri-Chinchwad Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांचा वाढदिवस येत्या २९ तारखेला आहे. त्यानिमित्त पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल नाका येथे लागलेल्या त्यांच्या भव्य अभीष्टचिंतनाच्या बॅनरची सध्या मोठी चर्चा आहे. कारण त्यावर रोहित यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यावर भावी मुख्यमंत्री म्हणून याअगोदर फ्लेक्स लागून मोठी चर्चा झालेले रोहित पावरांचे चुलते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी आज पिंपरीत करताच रोहित सावध झाले आहेत.

Rohit Pawar
Ajit pawar Big Statement : अजितदादांचे मोठे विधान; 'माझ्याकडं आज अर्थखातं, पुढे टिकेल की नाही, माहिती नाही...'

सध्या वरील पवार चुलते-पुतण्यात नाव न घेता चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पिंपरी-चिंचवडची जबाबदारी शरद पवारांनी रोहित यांच्याकडे सोपविली आहे. त्यानंतर १८ सप्टेंबरला त्यांनी केलेल्या पहिल्याच शहर दौऱ्यात अजितदादांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केलं होतं.

तर गणेशोत्सवानिमित्त झालेल्या त्यांच्या कालच्या दुसऱ्या शहर भेटीत त्यांनी पुन्हा अजितदादा व त्यांच्या गटावर उपहासात्मक टीका केली. त्यातही अजितदादांचे कट्टर समर्थक आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

दरम्यान,उर्से टोल नाक्यावरील बॅनरची निगेटिव्ह चर्चा सुरू होताच रोहित सावध झाले आहेत. कारण असे बॅनर लावून काहीही उपयोग नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते, तर मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर १४५ चा आकडा गाठावा लागतो. नाही तर मुख्यमंत्री व्हायचं हे केवळ दिवा स्वप्नच राहते, असा टोला अजितदादांनी लगावला. आज सकाळी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर लगावताच रोहित यांनी सोशल मीडियातून (एक्स) आपल्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स न लावण्याचे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तासाभरापूर्वी केले आहे. बॅनर न लावता त्यावर होणाऱ्या खर्चातून विद्यार्थी आणि चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना आवश्यक वस्तू द्याव्यात, असे आवाहन केले आहे. आपण इथे कोणत्या पदासाठी नाही, तर विचारधारेच्या लढाईसाठी काम करीत आहोत, असे सांगत पदे येतात आणि जातात; पण विचारधारेचं तसं नाही. ती एकदा सोडली,तर कोणत्याही पदाला किंमत राहत नाही.हाच विचार कार्यकर्त्यांनीही पुढे न्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Rohit Pawar
BJP Pune News: भाजपच्या माजी नगरसेवकाने पुणेकरांना घातला २५ कोटींचा गंडा? काय आहे प्रकार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.