Ajit pawar Big Statement : अजितदादांचे मोठे विधान; 'माझ्याकडं आज अर्थखातं, पुढे टिकेल की नाही, माहिती नाही...'

Baramati News ; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर असूनही अजित पवार बारामतीत होते.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati News : अजित पवार आज राज्य सरकारमध्ये आहेत. माझ्या हातात अर्थखातं आहे, त्यामुळे आपल्याला जरा झुकतं माप मिळतं. पण पुढे हे टिकेल की नाही टिकेल, हे माहिती नाही. कारण पुढचं कोणी सांगितलं आहे, असे आश्चर्यकारक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केले. (I have finanance ministry today; Don't know if it will last or not : Ajitdada's statement)

बारामतीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (ता. २३ सप्टेंबर) मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबईत येऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तसेच, मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानात मार्गदर्शनही केले. मात्र, भाजपचे पॉवरफुल नेते मुंबईत येऊन अजित पवार हे बारामतीत निघून आल्याने शनिवारपासून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Ajit Pawar
Ram Shinde Secret Explosion : रोहित पवारांनी २०१९ मध्ये चंद्रकांतदादांना भेटून हडपसरमधून भाजपचे तिकिट मागितले होते; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

अमित शाह मुंबईत येऊनही अजित पवार यांनी बारामतीमधील कार्यक्रमांना पसंती दिल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात पुढे अर्थमंत्री राहीन की नाही राहणार, असे विधान केल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Ajit Pawar
Ramesh Kadam In Mohol : माजी आमदार रमेश कदमांसाठी मनसेच्याही स्वागत पायघड्या; मोहोळ मतदारसंघात उद्या ८ वर्षांनंतर येणार...

केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याला अनुपस्थित राहण्याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी बारामतीला २३ सप्टेंबर, तर पिंपरी-चिंवडला २४ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबरची वेळ पुण्याला दिली होती. मी जेव्हापासून बारामतीचे नेतृत्व करीत आहे, तेव्हापासून तेथील पाच संस्था बारामती दूध संघ, खरेदी विक्री संघ, सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बॅंक, बारामती बाजार समिती यांच्या वार्षिक बैठका होत्या. त्या बैठका मला चुकवायच्या नव्हत्या.

या संस्थांना मी पंधरा दिवस अगोदर तारीख दिली होती. मी शाह यांच्या कार्यालय भेटीला मुंबईत नसणार आहे, हे कळविले होते. माझा बारामतीचा दौरा ठरलेला आहे, हे मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही कानांवर घातले होते. बारामतीत रात्री उशिरापर्यंत भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू होता, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Nilesh Lanke Vs Vikhe Patil : आमदार नीलेश लंके भंडाऱ्यात न्हाले अन्‌ कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना टोमणे मारले

बावनकुळे म्हणतात, 'नैसर्गिक विधान, राजकीय नाही'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिप्पणी केली आहे. भविष्यातील कुणालाही माहिती नसतं. उद्या काय होईल. उद्याचा दिवस तुमचा माझा कसा असेल, हे तुम्हाला आणि मलाही माहिती नसतं, त्यामुळे अजित पवार यांचे नैसर्गिक विधान आहे, ते काही राजकीय विधान नाही.

Ajit Pawar
MLA Rajesh Patil Audio Clip Viral : दीड वर्षापूर्वीची क्लिप व्हायरल करून राष्ट्रवादी आमदाराला अडचणीत आणण्याचा डाव कोणाचा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com