Rupali Chakankar On Mangeshkar Hospital : ससूनचा अहवाल येईना, दीनानाथ रुग्णालयावर कारवाई होईना; रूपाली चाकणकरांनी केला खुलासा

Rupali Chakankar statement on Deenanath Mangeshkar Hospital controversy : तनिषा भिसे यांची खासगी माहिती ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून सार्वजनिक करण्यात आली आहे. आणि याबाबत अलंकार पोलिस स्टेशन येथे देखील भिसे कुटुंबाकडून तक्रार देण्यात आली आहे.
Rupali Chakankar Mangeshkar Hospital
Rupali Chakankar Mangeshkar Hospitalsarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत सरकारला दोन अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानंतर देखील अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबाबत खुलासा केला आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. पुण्यातील तनिषा भिसे हिच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहे. या प्रकरणात दोन अहवाला प्राप्त झाल असून उद्या (मंगळवारी) ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीच अहवाल प्राप्त होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची दिशा निश्चित होणार असल्याचं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

Rupali Chakankar Mangeshkar Hospital
Dr. Ambedkar Birth Anniversary : मुंबई महाराष्ट्राचीच कशी? आंबेडकरांनी दिलं होतं सडेतोड उत्तर, राज ठाकरेंकडून स्मरण

तनिषा भिसे यांची खासगी माहिती ही रुग्णालयाकडून सार्वजनिक करण्यात आली आहे. आणि याबाबत अलंकार पोलिस स्टेशन येथे देखील भिसे कुटुंबाकडून तक्रार देण्यात आली आहे. याबाबत गुन्हा नोंद होत असताना ससून रुग्णालयाचा अहवाल येणे बाकी आहे. उद्या तो अहवाल प्राप्त होणार आहे, असे चाकणकर यांनी सांगितले.

पहिल्या दिवसापासून याचा घटनेचा आमच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. जे या प्रकरणांमध्ये दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. पुढे कोणतीही तनिषा भिसे घडू नये ही जबाबदारी आमची असून ती आम्ही घेतली असल्याचे देखील रूपाली चाकणकर म्हणाल्या.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय आहे. त्यामुळे धर्मदायच अहवाल असणे गरजेच आहे. तसेच माता मृत्यू असल्याने माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असणे देखील गरजेचं आहे.आणि ससून रुग्णालयाच्या उच्च समितीचा अहवाल हा अजूनही आला नसून तो उद्या अहवाल प्राप्त होणार आहे. आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई ही केली जाणार आहे. तात्पुरत्या स्वरूपातील कोणतीही कारवाई होणार नाही.तर पुढे कोणत्याही प्रकारे तनीषा भिसे पुन्हा घडवू नये यासाठी जो अहवाल येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई केली.

नाराजीच्या चर्चांमध्ये तथ्य नाही...

रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, महायुती सरकार अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. जे कोणी असं सांगत असतील त्याला महायुती सरकार एकत्र काम करत असल्याचे बघवत नाही, असे दिसते आहे. राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उत्तम काम करत आहे.यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.

महात्मा फुले चित्रपटाला पाठींबा

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना चाकणकर म्हणाल्या, फुले यांच्या जीवनावरती आधारित आज पर्यंत जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत .त्यात सेंसर बोर्डाने कोणतीही काटछाट केलेली नाही.त्यामुळे हिंदीमध्ये येणाऱ्या महात्मा फुले यांच्या चित्रपटाच्या संदर्भात देखील कोणतीही काटछाट न करता हा चित्रपट आहे तसाच प्रदर्शित करण्यात यावा अशी आमची मागणी असल्याचे चाकणकर म्हणाल्या.

Rupali Chakankar Mangeshkar Hospital
Babasaheb Ambedkar University Dream : बाबासाहेब आंबेडकरांनी खरेदी केली होती 87 एकर जागा, 'या' कामासाठी करायचा होता उपयोग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com