Rupali Chakankar : रुपाली चाकणकर अडचणीत, सुनेत्रा पवारांची घेणार भेट, कारवाईबाबत पक्षात दोन गट?

Rupali Chakankar NCP Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत पक्षात दोन गट पडल्याची चर्चा आहे. प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Rupali Chakankar
Rupali Chakankar Sarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकर यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांना पक्षातून निलंबीत करण्यात यावे, तसेच प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून करण्यात आली.

आता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी देखील उघडपणे चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशोक खरात प्रकरणात नवीन माहिती समोर येत असताना चाकणकरांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी अंतर्गत आवाज उठवला जात आहे. मात्र, यावरून पक्षात दोन गट पडल्याची चर्चा आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजून त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पक्षाची बदनामी टाळण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

ते म्हणाले, भोंदू बाबाच्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून काम करणाऱ्या सर्वांची चौकशी आणि कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारा पूरोगामी पक्ष आहे.

Rupali Chakankar
Sangamner Panchayat Samiti controversy : माजी मंत्री थोरातांच्या बंधूंवर गुन्हा; कोकटेंविरोधात महिलांच्या गंभीर तक्रारी, आतली ‘राजकीय कथा’ उघड!

अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर ट्रस्टी होत्या आहेत. आणि या भोंदू बाबाच्या नादाला लागून जर त्यांनी लोकांनी गंडवण्याचं काम केले असेल तर ते चुकीच आहे. त्यामुळे त्यांची देखील चौकशी होणार हे उघड आहे. चौकशीत काही आढळून येवून पक्षाची बदनामी होण्याच्या आधीच त्यांचा राजीनामा पक्षाने घ्यायला हवा, असे आहेर यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर या आज सुनेत्रा पवार याची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत त्या आपली बाजू सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडतील. दरम्यान, ज्या प्रकारे त्यांनी आपल्या महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे दिला त्याच प्रकारे जर त्यांनी समाधानकारण खुलासा केला नाही तर प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा त्यांना सुनेत्रा पवारांकडे द्यावा लागेल, अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादीत दोन गट?

रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे.नाशिक महिला आघाडीकडून चाकणकर याच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.त्यामुळे पक्षातील मोठा नेता मागे असल्याशिवाय ही मागणी होऊ शकत नाही, अशी चर्चा आहे. तर, दुसऱ्या गटाकडून चाकणकर यांच्यावर लगेच कारवाई नको, अशी भूमिका घेतली असल्याची समजते.

Rupali Chakankar
NAFED onion scam : कांदा खरेदीत काळेबेरे? लंकेंची थेट CBI तपासाची मागणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com