Sangamner Panchayat Samiti controversy : माजी मंत्री थोरातांच्या बंधूंवर गुन्हा; कोकाटेंविरोधात महिलांच्या गंभीर तक्रारी, आतली ‘राजकीय कथा’ उघड!

Self-help group women in Sangamner, backed by Congress supporters of Balasaheb Thorat, allege political discrimination by Panchayat Samiti employee Nandlal Kokate : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंधूंनी संगमनेर पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीची दुसरी, पण धक्कादायक राजकीय बाजू समोर आली आहे.
Sangamner Panchayat Samiti controversy
Sangamner Panchayat Samiti controversySarkarnama
Published on
Updated on

Sangamner local news controversy : काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद नाना थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांनी संगमनेर इथल्या पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली असली तरी, या घटनेमागील आणखी दुसरी राजकीय कथा समोर आली आहे. मारहाण झालेला पंचायत समिती तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांच्यावर, राजकीय हेतूने प्रेरित काम करणे, महिला बचत गटांना विशिष्ट राजकीय कार्यक्रमांची सक्ती करणे, उर्मट अन् उद्धट वागणूक देणे, गैरवर्तन करणे, लज्जास्पद शब्दांचा वापर करणे, अशा विविध तक्रारी महिलांनी संगमनेर पोलिसांकडे दिल्या आहेत.

संगमनेर (Sangamner) पंचायत समितीचा तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे याच्या उर्मट अन् उद्धट वागणुकीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांनी मारहाण केली. यानंतर संगमनेर पोलिस ठाण्यात बाळासाहेब थोरात यांचे चुलब बंधू शरद थोरात ऊर्फ नाना थोरातांसह नऊ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याचवेळी काही महिलांनी संगमनेर पोलिस ठाण्यात मोर्चा नेत, नंदलाल कोकाटेंविरोधात तक्रार दिली.

बचत गटांच्या माध्यमातून तालुकाभर महिला सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या सीआरपी आणि बचत गट चालकांना राजकीय दबाव सहन करावा लागत आहे. सत्ताधाऱ्यांच्या (Mahayuti) कार्यक्रमांना हजेरी लावण्याची सक्ती होते. तसंच कार्यालयात अधिकाऱ्यांकडूनही चुकीची वागणूक दिली जाते. या विरोधात जाब विचारल्यास अधिकाऱ्यांकडून उर्मट आणि उद्धट वर्तन केले जाते.

Sangamner Panchayat Samiti controversy
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

शेडगाव इथल्या महिलेचे मानधन जाणीवपूर्वक रोखून धरण्यात आले होते. या संदर्भात संबंधित महिलेनी वारंवार मागणी करत, पूर्ण मानधनाची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट, अभियानाचा तालुका व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांनी, महिलेशी गैरवर्तन केले. लज्जास्पद शब्दांचाही वापर केला.

Sangamner Panchayat Samiti controversy
Rupali Chakankar Controversy : शिक्षिकेवर हल्ला, शेकडो युवक भोंदूगिरीच्या विळख्यात; रूपाली चाकणकरांचा 'बुवा-बाबा संरक्षण आयोग' रंजना गवांदेंकडून एक्सपोज!

कोकटेंनी थोरातांवर उगारला दगड

शरद थोरात यांना संबंधित महिलेनं आपली कैफियत ऐकवली. शरद थोरात तात्काळ पंचायत समितीत जात गाठले. तिथं पंचायत समितीच्या आवारातच थोरात अन् नंदलाल कोकाटेंची भेट झाली. मात्र, तोडगा काढण्याऐवजी कोकाटे यांनी शरद थोरात यांना शिवीगाळ केली आणि उमर्टपणाची भाषा वापरली. हा सर्व प्रकार रस्त्यावरच घडला. थोरातांनी कोकाटेंना भाषेला आवर घालण्यास सांगितले. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने रस्त्यावरचा दगड उचलला.

पंचायत समिती अशी झाली मारामारी?

थोरात निघून गेल्यावर, हा प्रकार कार्यकर्त्यांना समजताच, त्यांनी पंचायत समिती गाठली आणि कोकाटेंना जाब विचारला. तिथंही उमर्टपणाचीच भाषा वापरली गेल्याने वाद चिघळला अन् थोरातांचे कार्यकर्ते कोकाटेंना भिडले. कोकाटे यांच्या फिर्यादीवरून शरद थोरात, अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात, अक्षय भालेराव, शिवमत भोकरे यांच्यासह नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद थोरात स्वतःहून पोलिसांत हजर झाले.

कोकाटेविरोधात गंभीर तक्रारी

दरम्यान, संगमनेर पोलिस ठाण्यावर कोकाटेविरोधात काही महिलांनी तक्रार दिली आहे. पण तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. महिला मागे फिरल्या नाहीत. शेवटी ठाणे अमलदाराने तक्रार दाखल करून घेतली. ही तक्रार गंभीर स्वरूपाची असून, यावर पोलिस काय अॅक्शन घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

पंचायत समिती राजकीय अड्डा

अंगणवाडी सेविका, आशासेविका, शिक्षिका व सरकारी कर्मचारी यांना विविध राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याबरोबर सत्ताधारी व त्यांच्या पत्नी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याबरोबर त्यांच्याच उपस्थितीत कार्यक्रम झाला पाहिजे हा दबाव आहे. सर्वसामान्यांची कोणतेही काम याठिकाणी होत नसून सध्या पंचायत समिती हा सध्या राजकारणाचा अड्डा बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com