NAFED onion scam : कांदा खरेदीत काळेबेरे? लंकेंची थेट CBI तपासाची मागणी!

Ahilyanagar MP Nilesh Lanke joins Parliament protest demanding a CBI inquiry into alleged irregularities in onion procurement by NAFED and NCCF : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात संसद आवारात खासदारांनी केलेल्या निदर्शनांमध्ये खासदार नीलेश लंके सहभागी झाले होते.
onion procurement scam India
onion procurement scam IndiaSarkarnama
Published on
Updated on

onion procurement scam India : देशांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संसदेच्या आवारात विरोधी खासदारांनी जोरदार निदर्शने केली. कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची मागणी केली.

तसंच नाफेड व एनसीसीएफमार्फत झालेल्या कांदा खरेदी प्रक्रियेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी खासदरांनी लावून धरली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरमधील खासदार नीलेश लंके यांनी सीबीआय चौकशीची मागणी जोरदार लावून धरली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी संसद आवारात विरोधी खासदारांनी केलेल्या निरदर्शांमध्ये खासदार भास्कराव भगरे, खासदार बजरंग सोनवणे, खासदार शोभा बच्छाव, खासदार बाळ्या मामा म्हात्रे आणि खासदार धैर्यशील मोहिते, खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) सहभागी झाले होते. खासदारांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजूट दर्शवली.

देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmer) ज्वलंत प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदारांनी संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा, वाढत्या खर्चावर नियंत्रण यावे आणि कांदा बाजारपेठेला स्थैर्य मिळावे, या प्रमुख मुद्यांकडे लक्ष वेधण्यात आलं.

onion procurement scam India
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

कांदा उत्पादक शेतकरी, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारातील अस्थिर दरांमुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. त्यातच केंद्र सरकारच्या बदलत्या निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत, असल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी संसद परिसरात आंदोलन करत केंद्र सरकारसमोर विविध मागण्या मांडल्या.

onion procurement scam India
Rupali Chakankar Controversy : शिक्षिकेवर हल्ला, शेकडो युवक भोंदूगिरीच्या विळख्यात; रूपाली चाकणकरांचा 'बुवा-बाबा संरक्षण आयोग' रंजना गवांदेंकडून एक्सपोज!

बियाण्यांच्या किंमती नियंत्रण आणा

आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव लागू करावा, दर्जेदार बियाणे स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावेत, बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण आणावे, कांद्यावरील निर्यात बंदी हटवून निर्यात पूर्णपणे मुक्त करावी, कांद्याची निर्यात वाढीसाठी ठोस धोरण आखावे, नाफेड व एनसीसीएफमार्फत झालेल्या कांदा खरेदी प्रक्रियेची सीबीआयमार्फत चौकशी करावी यांचा समावेश केला.

शेतकऱ्यांचा आवाज वाढवणार...

खासदार लंके म्हणाले, “देशातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या घामाचे योग्य मोल मिळवून देण्यासाठी हा लढा उभारला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.” संसद भवन परिसरात झालेल्या या निदर्शनांमुळे देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज अधिक तीव्र झाला असून, केंद्र सरकारने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com